राऊत, पांडे, परब यांच्यावरील कारवाईबाबत सोमय्यांचे नवं टि्वट

सीबीआय आणि ईडीने संजय पांडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात प्रारंभ केला आहे. शिवसेना नेता अनिल परब यांचे रिसोर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 Kirit somaiya, Sanjay Raut
Kirit somaiya, Sanjay Raut sarkarnama

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे सीबीआय आणि ईडीने संजय पांडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात प्रारंभ केला आहे. शिवसेना नेता अनिल परब यांचे रिसोर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरु आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. (Kirit somaiya news update)

मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, भाजपनेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी याबाबत टि्वट (Tweet) करीत पांडेसह शिवसेना नेत्यांसह शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.

माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्या विरोधातही सोमय्यांनी टीका केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर "बेनामी" मालमत्ते विरूद्ध कारवाई सुरु असल्याचे सोमय्यांनी म्हटलं आहे.

राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावेळी राऊत यांनी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती.

संजय राऊत यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार करत मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

 Kirit somaiya, Sanjay Raut
मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय ; पोलिस महासंचालक-आयुक्तांना सूचना

किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत (Uddhav Thackeray) केलेल्या टि्वटमुळे शिंदे गटातील आमदार संतप्त झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये (Tweet) उद्धव ठाकरेंसाठी माफिया हा शब्द वापरला होता, त्याला उत्तर देताना शिवसेनेच्या दोन आमदारांनी आक्षेप घेतला आहे.

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com