संजय राऊत अडचणीत ; सोमय्यांनी केला शंभर कोटींचा मानहानीचा दावा

मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.
Kirit Somaiya on Sanjay Raut, Kirit Somaiya News, Sanjay Raut News
Kirit Somaiya on Sanjay Raut, Kirit Somaiya News, Sanjay Raut Newssarkarnama

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या ( MEDHA SOMAIYA ) यांनी युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून १०० कोटीचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. (Kirit Somaiya on Sanjay Raut)

याबाबत माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, "संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते आहेत. आता त्यांनी माफी कशी मागावी याची तयारी सुरू करावी. संजय राऊत यांनी जे आरोप केले त्याबद्दल त्यांनी आधी माफी मागावी.उद्धव ठाकरे यांच्या माफियाराजला धडा शिकवण्यासाठी 100 कोटींची अवमान याचिका मेधा सोमय्या यांनी केली आहे. महाराष्ट्रात माफियाराजची दहशत माजली आहे,"

दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न सुरु आहे. या सगळ्या पापाचे फळ त्यांना मिळणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. "आता कितीची पेनल्टी आणि दंड व्हावा हे न्यायालय ठरवेल यातील एकही पैसा आम्हाला नको आहे. सर्व पैसे धर्मदाय संस्थेला द्यावेत परंतु महाराष्ट्रातील जनतेला संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी पाहिजे आहे," असे सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya on Sanjay Raut, Kirit Somaiya News, Sanjay Raut News
अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश यांची अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल

"संजय राऊतांविरोधात वकील अमित मेहता यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.अमित मेहता आणि कंपनी कोर्टात मेंशन करणार आहे. जून महिन्यात सुनावणी सुरु होईल," असे सोमय्यांनी सांगितले. राऊतांनी नगरविकास विभागाकडे सोमय्यांची तक्रार केली होती. या घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांची चौकशीही झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in