सरनाईकांवर मेहेरबानी; मग मिलिंद नार्वेकरांवरच 'अन्याय' का?

शिवसेना (ShivSena) आमदार प्रताप सरनाईक यांचा राज्य-सरकारने २१ कोटींची मालमत्ता कर माफ केला आहे.
Milind Narvekar
Milind Narvekarsarkarnama

मुंबई : शिवसेना (ShivSena) आमदार प्रताप सरनाईक यांचा राज्य-सरकारने २१ कोटींची मालमत्ता कर माफ केला आहे. याविषयी थेट राज्याच्या मंत्रिमंडळातच निर्णय घेण्यात आला. यावरुन भाजपने (BJP) ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्राला लुटणाऱ्या ठाकरे सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, अशा शब्दात निशाणा साधला.

Milind Narvekar
'पवारांनी असेच मुख्यमंत्रीपद ताब्यात घेतले होते, तेव्हा पराभव झाला होता...'

या संदर्भात सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये सोमय्या म्हणाले, ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रताप सरनाईक यांचे विहंग गार्डन चे अनधिकृत बांधकाम व ₹२१ कोटींचा दंड माफ केला! आत्ता अनिल परब यांचा रिसॉर्ट केव्हा अधिकृत घोषित करणार? मिलिंद नार्वेकरांवर अन्याय का? मिलिंद यांचा बंगलो का अधिकृत घोषित केला नाही?'' असे सवाल सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सरकारकडून सरनाईक यांच्या या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

एकूणच या निर्णयामुळे ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांच्यावर अचानक इतके मेहरबान का झाले आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सरनाईक हे मागच्या काही काळापासून ईडीच्या कारवाईमुळे चर्चेत आले होते. त्यानंतर मध्यंतरी त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली होती. या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा निर्णय ठाण्यातील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेउन घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरनाईक यांच्यामागे पक्ष उभा असल्याचा संदेश दिला जात असल्याचेही सांगितले जात आहे.

Milind Narvekar
महसूलमंत्र्यांच्या दोन स्वीय सचिवांनाच गंडविण्याचा प्रयत्न

मिलिंद नार्वेकरांचे प्रकरण काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचा अनधिकृत ठरलेल्या बंगल्याचे 50 टक्के बांधकाम पाडण्यात आले आहे. नार्वेकर यांचा दापोली तालुक्यातील मुरुड येथे बंगल्याचे बांधकाम सुरू होते. मात्र, ते बांधकाम कुठलीही प्रशासकीय नोटीस नसतांना स्वतःहून नार्वेकरांनी पाडले होते. नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम हे किनारपट्टी नियमन क्षेत्रात (सीआरझेड) येत असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. यानंतर केंद्रीय समितीने येथील कामाची पाहणी केली होती. बांधकामाबात सोमय्या यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in