याला म्हणतात 'ठाकरे सरकारचा जामीन घोटाळा'!

महापालिका आयुक्त अजोय मेहता, प्रवीण परदेशी ह्यांनी ही विरोध नोंदविला होता.
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांचे पुरावे वित्त मंत्रालयाला दिले, असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. (Kirit Somaiya criticizes Thackeray government)

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांना दररोज फोन करतो, पण ते फोन घेत नाहीत!

या संदर्भात सोमय्य यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ठाकरे सरकारने 28 नोव्हेंबर 2019 रोजी शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 29 नोव्हेंबर रोजी दहिसर येथे 2.5 एकर जमीन ९०० कोटीत अल्पेश अजमेरा बिल्डरकडून विकत घेतली, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अल्पेश अजमेरा बिल्डरने ही जमीन 2.55 कोटीमध्ये मस्केरहान्स परिवाराकडून विकत घेतली होती. प्रत्यक्षात ही जमीन पूर्णपणे अतिक्रमणची असल्याने ती खरेदी न करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला होता.

महापालिका आयुक्त अजोय मेहता, प्रवीण परदेशी ह्यांनी ही विरोध नोंदविला होता. तरी हो ठाकरे सरकारने दहिसरची ही जमीन विकत घेतली. मुंबई महापालिकेने ३४९ कोटी रुपये दिले आहेत. उरलेले पैसे द्यायचे आहे. ह्याला म्हणतात "ठाकरे सरकारचा जामीन घोटाळा" असा सणसणाटी आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा मुद्दा चेर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
ठाकरे सरकार अन् सीबीआय पुन्हा आमनेसामने? सर्वोच्च न्यायालयानेच केली विचारणा...

त्याच बरोबर सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, प्रधान डिलर कंपनीकडून पैसे आले. UEA या कंपनीमधे गेले. त्याची चौकशी सुरू झाली. चार महिन्यापूर्वी हे प्रकरण पुढे आले. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वसुली टीममधील हा 16 वा खेळाडू आहे. शेल कंपन्यांना रोख पैसे दिले. जाधव यांनी शेल कंपनी बनविली आहे. या चौकशीत गैरप्रकार समोर आला आहे. जाधव यांनीच सांगावे कितीचा घोटाळा आहे, असे सोमय्या म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सोमय्या यांनी निशाणा साधला आहे. दादांच्या दोन लोकांना ईडीने नोटीस पाठवली. त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सोमय्या म्हणाले. शिवसेना यूपीएत ही त्यांची नौटकी आहे. अनेक राज्यात ते निवडणूक लढवितात आणि हारतात, असा टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in