आपल्या गुन्ह्याची शिक्षा आईला होणार नाही, याची काळजी भावना गवळींनी घ्यावी!

ईडीने गवळी यांच्या केस संदर्भात चार्जशीट दाखल केली आहे.
Bhavana Gawli
Bhavana Gawlisarkarnama

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shiv Sena) नेत्यांवर निशाणा साधला. जालन्याच्या साखर कारखान्यात भागीदार असलेले दहा शेतकरी आपल्याला भेटायला आले आहेत. त्यांनी आपल्याकडे शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या गैरव्यवहाराची तक्रार केली. त्यामुळे आपण 1 डिसेंबरला जालन्याला जाणार, अशी घोषणा सोमय्या यांनी केली. तसेच सोमय्या यांनी या वेळी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यावरही टीका केली.

Bhavana Gawli
पंडितअण्णा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात या गोष्टीवरून वाद झाला होता...

सोमय्या म्हणाले, "ईडीने गवळी यांच्या केस संदर्भात जी चार्जशीट दाखल केली आहेत त्यात दोन नावे आहेत. दोघांच्या नावावर 69 कोटींची संपत्ती आहे. या दोघांपैकी एक आरोपी सईद खान हा सध्या जेलमध्ये आहे व दुसरा आरोपी भावना गवळी यांच्या आई आहेत. गवळी यांच्या आईच्या नावाचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे, असे सोमय्या म्हणाले. माझी भावना गवळी यांना विनंती आहे, आपण केलेल्या शंभर कोटीच्या घोटाळ्याची शिक्षा आईला देऊ नका. ईडीसमोर हजर व्हा, असे सोमय्या म्हणाले.

Bhavana Gawli
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षातील कामगिरीवर फडणवीस; म्हणाले…

खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. खोतकर यांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. साखर कारखान्यासाठी ही जमीन देण्यात आली होती, असेही सोमय्या म्हणाले. या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे, असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com