सोमय्या पुन्हा अॅक्टिव्ह; अस्लम शेख यांच्यावर १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Kirit Somaiya | Congress | Aslam Shaikh : शिंदे सरकारकडून कागदपत्र मिळाल्याची सोमय्यांची कागदपत्र
Aslam Shaikh _ Rahul Gandhi
Aslam Shaikh _ Rahul Gandhi sarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) काळात सातत्याने टीका करणारे आणि भ्रष्टाचाराचा आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सत्तांतर झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून शांत दिसून येत होते. मात्र नवीन सरकारच्या काळात किरीट सोमय्या पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले असून आज त्यांनी मुंबई उपनगरचे माजी मंत्री पालकमंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांच्यावर तब्बल १ हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

पत्रकार परिषद घेवून किरीट सोमय्या म्हणाले, महाविकास आघाडी हे लुटारू सरकार होते. त्यातील आता आणखी एका मंत्र्यांचा १ हजार कोटींचा घोटाळा आज मी मांडणार आहे. गेल्या २ वर्षात काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी मड या भागात तब्बल २८ फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. यातील ५ स्टुडिओ सी.आर.झेड झोनमध्ये आहेत. २०१९ ला ही जागा हिरवीगार होती मात्र २०२१ मध्ये हा परिसर सी.आर.झेडमध्ये नाही असे पर्यटन विकास मंडळाने म्हटले आहे, असेही सोमय्यांनी सांगितले.

कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवण्यात आली आहे. मात्र मंग्रोवस झाडांची कत्तल करुन स्टुडिओ उभारण्यात आले आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्यांच्या दाव्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे १० लाख स्केअर फूटची जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले. भाटीया स्टुडिओची ३ एकर जागा कागदावर दिसते, परंतु खरे बघितले तर अधिकची २ एकर जागा वापरून फिल्म सेट ऐवजी फिल्म स्टुडिओ बांधकाम केले. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या बाजुच्या प्लॉटला भेट दिली होती.

शिंदे सरकारकडून कागदपत्र मिळाल्याची कबुली :

सोमय्या यांनी आज शिंदे सरकार आल्यानंतर काही पेपर मिळाले ते आधी मिळत नव्हते, अशी जाहीर कबुली दिली. ते म्हणाले, होमवर्क करायला वेळ लागतो. पण आता शिंदे सरकार आले म्हणून काही पेपर मिळाले ते आधी मिळत नव्हते. आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचविण्याचे काम करायचे. पण आता शिंदे फडणवीस सरकार घोटाळेबाजांसाठी काम करत नाही. माझे याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, दोघांकडून आश्वासन मिळाले आहे, लवकरच चौकशी होईल. तसेच यासंदर्भात कोस्टल रोड विभागालाही पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com