आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी आता पालघर पोलिसांच्या कोठडीत

पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचे आमिष देऊन लुबाडणूक केल्याप्रकरणी पालघर (palghar police) मधील केळवे पोलिस ठाण्यात किरण गोसावी (kiran gosavi) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
Kiran Gosavi and Aryan Khan
Kiran Gosavi and Aryan KhanFile Photo

पालघर : आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी (kiran gosavi) याला केळवे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर मधील दोन तरुणांना नोकरीचे आमिष देऊन लुबाडणूक केल्याप्रकरणी पालघर (palghar police) मधील केळवे पोलिस ठाण्यात किरण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

पालघर जिल्ह्यातील या दोन तरुणाची फसवणूक करतानाच त्याने अन्य व्यवसायानिमित्त पालघर मध्ये अनेक फेऱ्या मारल्याने जिल्ह्यात वाढत्या ड्रग पुरवठ्यात त्याचा हात आहे का?याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी होत आहे. पालघर न्यायालयाने किरण गोसावीला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरी देतो, असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी याने बँक खात्यामार्फत घेतली होती. त्याच्या नवी मुंबई येथील के. पी. इंटरप्राईजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत होता. या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी ह्या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलिस ठाण्यात धूळ खात पडून होता. मात्र आर्यन खान प्रकरण पुढे आल्यानंतर आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी याला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्याला पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलिस ठाणे गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

Kiran Gosavi and Aryan Khan
MPSCची मोठी घोषणा : PSI पदाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

अनेक गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला एनसीबीने साक्षीदार बनविल्याच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्याने एनसीबीचे अधिकारी अडचणीत सापडले होते. त्यातच या प्रकरणात गृह विभागाकडून पालघर पोलिसांवर दबाव वाढत चालल्याने अखेर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादंवि कलम 420,406,465,467,471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला अटक केल्यानंतर आत्ता केळवे पोलिसांनी किरण गोसावीला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com