खर्गेंनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली अन् पृथ्वीराजबाबांना दिली मोठी जबाबदारी...

Prithviraj chavan : गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून चव्हाण यांनी याआधी चांगली जबाबदारी पार पाडली होती.
Prithviraj chavan, Mallikarjun Kharge Latest News
Prithviraj chavan, Mallikarjun Kharge Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यावर आता गुजरात विधानसभा निवडणुकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चव्हाण यांच्यासोबत खासदार मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच दोन मराठी नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. (Prithviraj chavan, Mallikarjun Kharge Latest News)

Prithviraj chavan, Mallikarjun Kharge Latest News
अलीकडच्या काळात काही जणांकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू

चव्हाणांना मोठ्या कालावधीनंतर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी मिळाली आहे. गुजरात निवडणुकीसाठी विभागनिहाय निरीक्षकांची निवड करण्यात आली असून वासनिक आणि चव्हाण यांच्यासह पाच जणांची विभागनिहाय निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये चव्हाणांकडे बडोद्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, गुजरातची जबाबदारी देण्यात आलेल्या पर्यवेक्षकांमध्ये मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश, बीके हरिप्रसाद, केएच मुनियप्पा यांचा समावेश आहे. त्यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एका निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली.

Prithviraj chavan, Mallikarjun Kharge Latest News
'50 खोके' दुखवताहेत डोके? बंडखोर आमदारांमध्ये वाढतेयं अस्वस्थता...

वासनिकांवर दक्षिण विभागासाठी, मोहन प्रकाश सौराष्ट्र विभागासाठी, पृथ्वीराज चव्हाण यांना मध्य विभागासाठी, हरिप्रसाद यांची उत्तर विभागासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजस्थानचे काही मंत्री आणि आमदारांसह ३२ नेत्यांना गुजरातच्या २६ लोकसभा मतदारसंघांसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रभारी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी चांगली जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने २००४ मध्ये गुजरात मध्ये १२ खासदार निवडून आणले होते. यामुळे गुजरातच्या खासदारांच्या वाढलेल्या संख्येमुळे काँग्रेस लोकसभेत एक नंबरचा पक्ष ठरला होता आणि मित्र पक्षांच्या साहाय्याने सत्तेवर आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com