
Bharat Jodo Yatra News Update : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. असे असतानाच भारत जोडो यात्रेवर दहशतवादाचं सावट असल्याचे निदर्शनास आले आहे. भारत जोडो यात्रेबाबत मुंबईत संशयास्पद हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतल्या दोन भागात संशयास्पद हालचाली सुरु असल्याचं तपास यंत्रणांना तपासातून आढळून आले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत मुंबईत संशयास्पद हालचाली सुरु असून खलिस्तानी समर्थकांकडून 'खून का बदला खून'ची मोहिम सुरु असल्याचे तपासात आढळून आले आहे.
भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये पोहचल्यानंतर राहुल गांधी यांनी ११ जानेवारी रोजी डोक्यात पंजाबी पगडी घालून सुवर्ण मंदीरात दर्शन घेतले. त्यानंतर खलिस्तानी फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग याने 'खून का बदला खून'चे आवाहन केले होते. तेव्हा चेंबूर येथील एका गुरूद्वारा परिसरात आणि वडाळा येथील भक्तीपार्क येथे राहुल गांधींविरोधात पोस्टरबाजीही करण्यात आली होती.
या पोस्टरवर जेलमध्ये बंद असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना सोडण्याचीही मागणी करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी तातडीन ते पोस्टर हटवले खरे मात्र पोस्टर लावणारे आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबईतील खलिस्तान समर्थक चळवळीशी संबंधित अनेक लोकांचा सहभाग या घटनेमागे आढळून आला असून तपास यंत्रणा मुंबई पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यामागे खलिस्तान फुटीरतावादी नेता आणि दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा हात असल्याचे सांगितले जाते. शिख फॉर जस्टिस मुव्हमेंट या बंदी घातलेल्या संघनेचा तो प्रमुख असून वेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी परदेशात राहून आयएसआयच्या इशाऱ्यावर भारतात त्याच्या टोळीकडून दहशतवादी कारवाया केल्या जातात. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या या छुप्या आव्हानाला पाठिंबा देणार्या पंजाबमधील आणखी एका संघटनेचे नावही समोर आले असून 2022 मध्ये या संघटनेच्या संशयावरून त्या संघटनेची चौकशी सुरू असल्याचे समजले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.