केतकीने शरद पवारांची माफी मागावी, खासदार नवनीत राणांचे आवाहन

Ketaki Chitale| Sharad Pawar| अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे
Navneet Rana| Ketaki Chitale| Sharad Pawar|
Navneet Rana| Ketaki Chitale| Sharad Pawar| Sarkarnama

Ketki should apologize to Sharad Pawar

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत एक वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. केतकी विरोधात राज्यातील काही भागात गुन्हा दाखल करण्यात आल्याने कल तिला ठाणे पोलिसांनी ताब्यातही घेतले. असे असतानाच खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांची माफी मागावी असे आवाहन केले आहे.

ट्विटरवर त्यांनी स्वतः चा एक व्हिडीओ शेअर करत केतकीच्या शरद पवार यांची माफी मागण्याचे आवाहन केले आहे. ''शरद पवार यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्षे महाराष्ट्रासाठी राजकीय संघर्ष केला आहे. ते आपल्या सर्वांसाठी वडीलधारे आहेत. त्यांचा मान राखायला हवा. पण केतकी सारख्या लहान कलाकाराने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. केतकीने शरद पवार यांची माफी मागितली पाहिजे" असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

Navneet Rana| Ketaki Chitale| Sharad Pawar|
Mumbai Police : संजय पांडे यांच्या पहिल्याच निर्णयावर मुंबईकर खूष!

काय आहे प्रकरण?

केतकी चितळेने शनिवारी (१४ मे) तिच्या फेसबुकपेजवक अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिण्यात आलं आहे. केतकीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर केतकीवर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तिला काही मिनिटातच ताब्यात घेतलं तिच्या पोस्टनंतर शरद पवार समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. मंत्री जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि नवनीत राणा यांनीदेखील तिच्यावर सडकून टीका केली.

शरद पवार यांच्यावर हिन पातळीवर टीका करणाऱ्या केतकी चितळे हिचा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी समाचार घेतला आहे. कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दांत राज यांनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com