Ketaki Chitale news केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

केतकी चितळे हिने शरद पवारांविषयी (Sharad Pawar) अतिशय हिन दर्जाची पोस्ट शेअर केली आहे.
Ketaki Chitale news केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Ketaki Chitale news

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ने वादग्रस्त पोस्ट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी गरळ ओकली. यानंतर राज्यातील काही भागात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Ketaki Chitale news केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

केतकीने एका वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट तिने शेअर केली. त्या पोस्टमध्ये अतिशय आपत्तीजनक अशा टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. तिने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्याविरूद्ध राज्यातील काही ठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद् आव्हाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज दुपारपर्यंत पोलिस केतकी चितळे हिला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर अशी हिन दर्जाची टीका केल्यानंतर आता राज्यभरातून केतकीविरोधात प्रतिक्रीया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या केतकीवर संताप व्यक्त केला आहे. 'कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,'' अशा शब्दांत राज यांनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com