केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

Ketaki Chitale | Sharad Pawar | केतकी चितळे हिने शरद पवारांविषयी अतिशय हिन दर्जाची पोस्ट शेअर केली आहे.
Ketaki Chitale
Ketaki Chitalesarkarnama

पुणे : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिने काल (शुक्रवारी) फेसबूकवरुन एका पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. केतकी अनेकदा अशा पोस्ट करत असते. मात्र या पोस्टमध्ये तिने वापरलेल्या भाषेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे चित्र आहे. या पोस्टच्या माध्यमतून टीका करताना तिने वापरलेल्या भाषेवरुन तिच्यावर टीका करण्यात येत असून ही भाषा अत्यंत खालच्या दर्जाची आणि गरळ ओकणारी असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या पोस्टवरुन आता केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली असून तिच्या विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आज दुपारपर्यंत पोलिस केतकी चितळे हिला ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

केतकीच्या पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच दोन समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नेटके यांनी काल रात्री दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकी चितळे हिच्यावर राष्ट्रवादीशिवाय समाजातील इतर स्तरातून देखील टीका करण्यात येत आहे.

याबाबत डाॅ. बालाजी जाधव यांनी टोकदार टीका केली आहे. चितळे नावाची कुणी एक बया आहे. तिने तिच्या वॉलवर advocate नितीन भावेची एक टुकार, बौद्धिक दिवाळखोरी आणि मानसिक विकृती दाखवणारी चंदू गोखले छाप कविता शेअर केलेली आहे. या संपूर्ण ओळींमध्ये पवार द्वेष कसा आणि किती ठासून भरलेला आहे हे कुणाही सज्जन माणसाच्या चटकन लक्षात येईल. कविता लिहिणाऱ्याने आणि ती शेअर करणाऱ्या नालायक व्यक्तीने वेडाचे झटके आल्याबरहुकूम हा समग्र प्रकार केलेला दिसत आहे. पैकी एका व्यक्तीला बरेच झटके येत असल्याचे त्यांच्याच पोस्ट मधून समजले आहे. पण यावेळचा हा झटका अमळ जोरातच बसलाय म्हणायचा.

भावे नावाच्या चंदू गोखले छाप कवीने आपल्या टुकार काव्याची सुरुवातच " तुका म्हणे " अशा शब्दाने केलेली आहे. या भावेने खरेतर " नितीन भावे म्हणे " किंवा " रामदास म्हणे " अशा नाममुद्रेने सुरुवात करायला हवी होती. पण त्याने ती तशी न करता " तुका म्हणे " यांना नाममुद्रेने केली आहे. म्हणजे पवारांची बदनामी करणारे शब्द जणू तुकाराम महाराजच लिहित आहेत असे वाचणाऱ्यास वाटावे. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची घोर विटंबना आहे. तुकोबांना आपल्या जीवाचे जीवन मानणाऱ्या करोडो वारकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असे जाधव यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com