
UPSC Civil Services Exam Result : 'यूपीएससी' परीक्षेत आपण देशात २५ वे आलो आहोत, यावर सुरूवातीला विश्वासच बसला नाही. या यशात आईचा मोठा वाटा आहे. आता कुठेही गेलो तरी आत्मीयतेने काम करणार असल्याचे राज्यात पहिल्या आणि देशात २५ व्या रँकने उतीर्ण झालेल्या कश्मिरा संख्ये हिने सांगितले. डॉ. कश्मिरा संखे ही मूळची ठाण्याची आहे. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले आहे. यावेळी कश्मिराने 'यूपीएससी' परीक्षेतील यशाची सविस्तर माहिती दिली. (UPSC Result)
केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल मंगळवारी (ता. २३) जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील उमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे. 'यूपीएससी'त ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली तर देशात २५ वी आली आहे. तर रिचा कुलकर्णी हिने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतना राज्यात पहिली आलेल्या कश्मिराने आपल्या यशाबद्दल माहिती दिली. UPSC CSE Final Result
कश्मिरा म्हणाली, "या निकालाबाबत एवढी मोठी अपेक्षा ठेवली नव्हती. मात्र या निकालाची आशा होती. आता निकाल लागला त्यावेळी सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे ही अंतिम यादी आहे का याबाबत तपासणी केली. त्यानंतर समजले की आपण देशात २५ वी रँक मिळविली आहे." या यशात आईचा वाटा मोठा असल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली, "लहानपणापासून 'यूपीएससी' करण्यासाठी आईने प्रेरणा दिली. त्यासाठी ती मला माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याबाबत माहिती देत होती. त्यांच्या बातम्यांची कात्रणे काढून दाखवत होती. त्यामुळे लहान वयापासूनच मला अधिकारी होण्याची ओढ निर्माण झाली होती." UPSC Civil Services Exam Result
कश्मिराने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. ती बॅचलर ऑफ डेन्टल सर्जरी (बीडीएस BDS) आहे. गव्हर्नमेंट डेन्टल कॉलेज मुंबई येथून तीने 'बीडीएस'ची पदवी घेतली. दरम्यान, शिक्षण घेताना आणि 'प्रॅक्टिस' करताना नागरी सेवेत जाण्याबाबत विचार केल्याचे तिने सांगितले. कश्मिरा म्हणाली, "शिक्षण घेताना जाणविले की 'डेन्टिस्ट' म्हणून आपण नागरिकांच्या आरोग्याबाबत काम करू शकतो. मात्र नागरीसेवेच्या माध्यमातून आपण विविध स्तरावर मोठ्या जनसमुदायांसाठी काम करू शकतो, याची जाणीव झाली. त्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली."
पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्याचेही कश्मिराने सांगितले. ती म्हणाली, "मी २०१९ च्या शेवटी 'यूपीएससी'च्या तयारीला सुरूवात केली. हा माझा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नात 'प्रिलियम'ही निघाली नव्हती. आता माझी देशात २५ रँक आहे. याचा आनंद आहे."
'यूपीएससी'तील ऑप्शनल विषयाबाबतही तिने यावेळी महिती दिली. तिने सांगितले की, "मेडिकलचे शिक्षण घेतल्याने मी अँथ्रॉपलॉजी (मानववंशशास्त्र) ऑप्शनल विषय घेतला होता. अभ्यास करताना समजले की अँथ्रॉपलॉजी आणि आपला समाज व आपली संस्कृतीचा खूप जवळचा संबंध आहे. हा विषय समाज आणि संस्कृतीला बांधून ठेवणारा विषय आहे. त्यामुळे त्यातील इंटरेस्ट वाढत गेला."
यावेळी कुठलेही केडर मिळाले तरी अत्मीयतेने काम करेल, असा विश्वासही कश्मिराने व्यक्त केला. ती म्हणाली, "मला आयएएसच (IAS) व्हायचे आहे. आता चांगली रँक असल्याने मी आयएएसलाच प्राधान्य देईल. दरम्यान, मला महाराष्ट्रात (Maharashtra) काम करण्याची संधी मिळाली तर फायद्याचे ठरेल. कारण राज्यातील लोकांची आणि भाषेची माहिती आहे. मात्र इतर कुठलेही केडर मिळाले तरी मी तितक्याच आत्मीयतेने काम करेल."
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.