Kasba By-Election : फडणवीस-पटोलेंमध्ये रंगली टोलेबाजी : 'धंगेकरांना जागा करावी लागेल' ; फडणवीस म्हणाले, 'एक जागा...'

Kasba By-Election : तीन राज्यात काँग्रेस कुठेच नाही, फडणवीसांचा खोचक सूर..
Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Kasba By-Election : Nana Patole : Devendra FadnavisSarkarnama

Maharashtra Budget Session : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद थेट राज्य विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात कसब्याच्या निकालावरून जोरदार टोलेबाजी रंगलेली दिसून आली.

कसबा विधानसभा निकालावरून फडणवीस आणि पटोले यांच्यात जोरदार टोलेबाजी रंगली. "धंगेकर आता निवडून आले, आता सभागृहात आसन व्यवस्था करावी लागेल," अशी मिश्कील टिपण्णी नाना पेटोलेंनी केली. तर यावर प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी पेटोलेंना टोले लगावले. "एक जागा जिंकल्यानंतर सभागृहात सांगायची वेळ येते," असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला.

Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Kasba Peth Election Result : बापट-टिळकांच्या पाठीशी असलेले मतदार हेमंत रासनेंच्या मागे का उभे राहिले नाही?

पटोले म्हणाले,"आता कसबाचा निकाल आला आहे अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अकरा हजार मतांच्या फरकाने निवडून आले. आता धंगेकरांना या सभागृहात बसायची पण जागा करावी लागेल."

यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, "मी नाना भाऊंचं अभिनंदन करतो. आता जो काही निकाल आहे तो स्विकारला पाहिजे. चिंचवडचा निकाल येईल तो ही स्विकारला पाहिजे. नाना भाऊ जसं आम्हाला कसब्याबाबत आत्मचिंतन करावे लागेल, तसं तुम्हाला ही आत्मचिंतन करावं लागेल. कारण तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कुठेच दिसत नाही. तुमच्यावर अशी वेळ आली की, एक जागा निवडून आली तर, तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावं लागतं, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Kasba By-Election : Nana Patole : Devendra Fadnavis
Kasba By Election : ...तर कसब्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक! रासनेंच्या पराभवानंतर शैलेश टिळकांचं मोठं विधान

दरम्यान, भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com