Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरेंना फोन ; म्हणाले..

Kasaba By Election : कसबा मतदार संघातून हेमंत रासने (Hemant Rasane)तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.
Kasaba By Election
Kasaba By Election sarkarnama

Kasaba By Election : कसबा (Kasaba By Election) आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजपचे आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कसबा मतदार संघातून हेमंत रासने (Hemant Rasane) तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.

या दोन्ही निवडणूका बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जपा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केले आहे. कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक तर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या जागांवर निवडणूक होत आहे. आता या दोन्ही जागेवर भाजपने उमेदवार दिले आहेत. कसबा पेठमधून हेमंत रासने यांना तिकीट देण्यात आले आहे.

तर चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना तिकीट मिळणार आहे. आज त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Kasaba By Election
Kasaba By Election : उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने म्हणाले, "गिरीश बापट यांच्या.."

दोन्ही मतदारसंघात येत्या २७ फ्रेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. भाजपने पुणे महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुक्ता टिळक यांचे पती शैलेस टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उमेदवारी न मिळाल्यामुळं अन्याय झाल्याचं सांगतानाच शैलेश टिळक यांना अश्रू अनावर झाले होते. ब्राम्हण महासंघाने पण याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Kasaba By Election
IAS Promotion : शिंदे-फडणवीस सरकारनं सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय..

गेल्या वीस वर्षांपासून मुक्ता टिळक या मतदारसंघात काम करत होत्या. त्यांनी अनेक पदांवर काम केलं. त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळेल, अशी आशा आम्हाला होती. आता पक्षानं घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून आम्ही भाजपचं काम करणार असल्याचं शैलेश टिळक म्हणाले. ब्राम्हण समाजाचा विरोध लक्षात घेता कसबा मतदार संघात भाजपला फटका बसल्याने शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

"कसबा विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार," असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढवली जाईल, असे रासने म्हणाले."कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला केली होती. भाजप ही निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे," असे रासने यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com