मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब
Dhananjay Munde, Karuna Mundesarkarnama

मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल! करुणा शर्मांनी टाकला बॉम्ब

धनंजय मुंडेंचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंचे इतर अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करुणा शर्मांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. मी जर सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असा दावाही त्यांनी केला. (Karuna Sharma News)

करुणा शर्मा म्हणाल्या की, माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडे पत्रकार परिषद घेणार होती, मात्र ती अनुपस्थित राहिल्याने मी पत्रकार परिषद घेत आहे. शिवानी ही मुंडेंच्या विरोधात मोठा गौप्यस्फोट कऱणार होती, पण मुलीला धमकावल्याने ती आज गैरहजर राहिली. मुंडेंच्या सांगण्यावरुन मी माझ्या बहिणीला घराबाहेर काढण्यात आलं. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्यांनी माझ्या बहिणीच्या मोबाईलवर मेसेज पाठवले. त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, अटकेची कारवाईही झाली. त्यांच्यामुळेच माझ्या आईला आत्महत्या करावी लागली. मीच मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नव्हतं. मी त्यांची इज्जत करत होते. मुंडेंवर विश्वास ठेवून २००८ पासून मी बहिणींशी बोलत नाही. माझ्या आईंची मुंडेंनी हत्या केली असून, मंत्रिपदाचा गैरवापर केला आहे. मुंडेंना मंत्री पदावरून हाकललं पाहिजे. माझ्यापासून दोन मुलांना जन्म देऊन त्यांनी आम्हाला रस्त्यावर सोडलं आहे. मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध असल्याचे पुरावे माझाकडे आहेत.

Dhananjay Munde, Karuna Munde
दोनच दिवसांत निकाल लावतो! सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर सुडाचा इशारा

करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्ष स्थापन केला आहे. पक्षाच्या माध्यमातून आगामी लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व निवडणुका लढवण्याचे त्यांनी जाहीर केले होते. याची सुरवात कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतून झाली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यांना केवळ १३२ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुढील विधानसभा थेट धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढवण्याची घोषणा केली होती. (Dhananjay Munde News)

Dhananjay Munde, Karuna Munde
साडेपाच महिन्यांनंतर अखेर रुपाली पाटलांवर राष्ट्रवादीनं टाकली मोठी जबाबदारी

दरम्यान, धनंजय मुंडेंना सहा-सहा मुले असून, अनेक पत्नी लपवल्याचा आरोप करुणा शर्मांनी केला होता. आमच्या दोघांच्या आयुष्यावर चित्रपट काढल्यास तो हिट होईल, असेही त्या म्हणाल्या होत्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, आमच्या प्रेमकहाणीवरील पुस्तक अंतिम टप्प्यात आहे. या पुस्तकातून मी अनेक पुरावे समोर आणणार आहे. या पुस्तकात आमची 25 वर्षांची कहाणी असेल. या पुस्तकात पुराव्यांसोबत आमच्या लग्नाचे फोटोही असतील. हे पुस्तक हिंदी भाषेत लिहून झाले असून, ते हिंदीसोबत मराठी भाषेतही असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in