Karuna Munde : बाईच्या शापामुळेच आघाडी सरकार पडलं, करुणा मुंडेंची टीका!

Karuna Munde : एका बापाचे असाल तर, मला बीडमध्ये निवडणुकीत हरवूनच दाखवा.
Karuna Munde
Karuna Munde Sarkarnama

मुंबई : माझ्या शापामुळेच महाविकास आघाडी सरकार पडले, हे सरकार पुन्हा कधी येणार नाही, अशी टीका अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय यांच्या द्वितीय पत्नी करुणा मुंडे यांनी केले आहे. यावेळी त्यांनी एका बापाचे असाल तर, मला बीडमध्ये निवडणुकीत हरवूनच दाखवा, असं आव्हान करुणा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडेंना दिलं आहे. मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य़च बोलले होते, धनंजय मुंडेंवर मी वारंवार 'करुणा' नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Karuna Munde
राष्ट्रवादीच्या नेत्यावर मेहेरबानी दाखवणे भोवले : दौंडच्या पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

एकीकडे महिलांचा सन्मान वगैरे गोष्टी बोलल्या जात आहेत. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वक्तव्य केले. पण मला सांगा सुप्रिया सुळे या एकच महिला आहेत का की, ज्यांच्यावर अन्याय झाला. माझ्यावेळी मला महाविकास आघाडीने न्याय दिलेला नव्हता. करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, सुप्रिया सुळे या मोठ्या राजकारणी आहेत म्हणून त्यांच्या समर्थन उभं राहिले.

Karuna Munde
Pandharpur : तीर्थक्षेत्र काॅरिडाॅर बाधितांबद्दल विखे पाटलांचे महत्वाचे वक्तव्य..

धनजंय मुंडे यांच्याकडून घटस्फोटा द्यावा यासाठी माझ्यावर दबाव येत होता. तेव्हा मी मीडियासमोर आले होते. तेव्हा मी महिला आयोगाकडे याबाबत सरकार तक्रार सुद्धा दिली. मात्र यावर आजपर्यंत त्यावर कसलीही कार्यवाही झालेले नाही. अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही पत्र दिले, आता पाहुयात ते कधी कारवाई करतात, असे करूणा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com