Karnataka Border Dispute : भाजपच्या मुख्यमंत्र्यांविरूद्ध, भाजपच्याच उपमुख्यमंत्र्याची लढण्याची तयारी!

Karnataka Border Dispute : आपण एका देशात राहतो, आपण शत्रू नाही आम्ही लढू..
Sangali
SangaliSarkarnama

Karnataka Border Dispute : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न सुटलेलं नसताना आता कर्नाटक सरकाडून नवी खुरापत सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगणार असल्याच्या विचाराबाबत कर्नाटक गांभीर्य़ाने विचार करतंय, असं वादग्रस्त विधान भाजपशासित कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधकांनी यावर गदारोळ माजवल्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सावध भाष्य केले आहे.

यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 2012 साली जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला होता. आता मात्र कोणत्याही गावाने कोणताही ठराव केला नाही. 2012 साली आम्हाला पाणी मिळत नाही, असं म्हणून त्यांनी ठराव केला होता. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही कर्नाटकशी तडजोड करून त्यांना हवं तिथं पाणी देऊन, आम्हाला पाणी हवं तिथ घेऊ असा निर्णय केला होता. त्यानंतर सुधारित योजना होती त्या नव्या योजनेमध्ये त्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय त्यावेळचे तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. तशी योजनाही केली होती. ती तयार झाली आहे, आता त्या योजनेला आपण मान्यता देणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.

Sangali
Fadanvis : सीमा वादावर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही...

कोविडमुळे मागचं सरकारने त्याला मान्यता दिलं नसेल. त्यामुळे आता त्याला तत्काळ मान्यता देवू आणि तिथे पाणी पोहचणार आहे. या सर्व योजनाला केंद्र सरकारने पैसे दिले आहेत. आताची कोणती नवी मागणी नाही, ही जुनी मागणी आहे. सीमा भागातील आपली लोकं आहेत. त्यांना मदत होणार आहे. कर्नाटक मुख्यमंत्री यांनी केलेलं वक्तव्य केलं, त्याबाबत लढू आणि आमची गावं आम्ही मिळवू. आपण एका देशात राहतो, आपण शत्रू नाही. आम्ही लढू आम्ही आमची गाव कुठेही जाणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

Sangali
Karnataka Border Dispute : कर्नाटकची नवी खुरापत : थेट सांगलीच्या जत तालुक्यावरच केला दावा!

काय म्हणाले होते कर्नाटकचे मुख्यमंत्री :

जत तालुका दुष्काळी असून, तिथे पाणी टंचाई असते. अशा दुष्काळी भागात पाणी देऊन आमच्या सरकारने मदत केली. जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला. या ठरावावर आम्ही गंभीरपणे विचार करत आहोत. सीमा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देत आहोत. मात्र महाऱाष्ट्राकडून सौहार्द बिघडवण्याचा काम होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in