Kapil Patil : सत्ता गेल्यामुळे काहीही वक्तव्य करायचे ? कपिल पाटलांचा पवारांना टोला

आम्हाला जो इतिहास शिकवलेला आहे तो इतिहास तुम्ही , शिकलात तोच आम्ही शिकलो. त्यांनी काही वेगळा शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही.
Kapil Patil
Kapil Patilsarkarnama

डोंबिवली : शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण संघर्ष समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आज डोंबिवलीत करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil)यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली. (Kapil Patil latest news)

शरद पवार यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पवारांवर टीका केली आहे. पाटील म्हणाले, " त्यांनी काही वेगळा इतिहास शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. ती उत्तुंग व्यक्तिमत्वाची लोक आहेत, त्यांच्या बाबतीत मला काही बोलता येत नाही. आम्हाला जो इतिहास शिकवलेला आहे तो इतिहास तुम्ही , शिकलात तोच आम्ही शिकलो. त्यांनी काही वेगळा शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. राज्य सरकारने जी पुस्तके काढली, त्या पुस्तकातून जो इतिहास शिकवला गेला तोच इतिहास आम्हाला माहीत, बाकीचा इतिहास आम्हाला माहीत नाही,"

"तुम्ही जो इतिहास शिकलात तोच आम्ही देखील शिकलो आहोत. त्यांनी काही वेगळा इतिहास शिकलेला असेल तर आम्हाला माहीत नाही. सत्ता गेल्यामुळे काहीही वक्तव्य करायचे याला काहीच अर्थ नाही," असा अप्रत्यक्ष टोला कपिल पाटील यांनी शरद पवार यांना लगावला.

Kapil Patil
पक्षश्रेष्ठींनी सांगितले असते तर मी घरी गेलो असतो ; फडणवीसांचे स्पष्टीकरण

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, गणेश म्हात्रे, बाबाजी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगरी कोळी समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारखे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भूमीपुत्रांनी आता आयपीएस, आयएएस अधिकारी होऊन देशाच्या जडणघडणी मध्ये योगदान द्यावे असा सल्ला यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

"राज्यातील जनतेने भाजपा व शिवसेनेला कौल दिला होता. परंतु सत्तेसाठी या लोकांनी न घडणारी महाविकास आघाडी घडवली. आणि भाजपाला निव्वळ सत्तेपासून बाहेर ठेवायचे हा हेतू मनामध्ये ठेवून सत्ता स्थापन केली गेली. जनमत हे सेना व भाजपाला होते तसेच सरकार यायला हवे होते. आता त्यांचे सरकार गेल्यामुळे काही वक्तव्य करणार याला काय अर्थ आहे," असे कपिल पाटील म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास स्वामी यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा यांचा संबध, याविषयी शरद पवारांनी भाष्य केलं. पुरंदरे यांनी सत्यांच्या आधारे मांडणी केली नाही,असा आरोप पवारांनी यावेळी केला.

"मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण कधीच पटले नाही, पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला," असे पवार म्हणाले. "सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in