ममतादीदींना कितीही प्रयत्न करु द्या; राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होणार!

मोदींजीच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) कोठूनही कोणालाही कन्व्हेन्स करू शकते
ममतादीदींना कितीही प्रयत्न करु द्या; राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होणार!
Kapil Patil Latest Marathi Newssarkarnama

डोंबिवली : राष्ट्रपती पदाची निवडणूक जुलै महिन्यात होत असून, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी देशातील 22 विरोधी पक्ष नेत्यांना पत्र पाठवू न बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. ममतादीदी कितीही प्रयत्न करू दे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केवळ 1 टक्के मतांची आवश्यकता आहे. मोदींजीच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) कोठूनही कोणालाही कन्व्हेन्स करू शकते, असा विश्वास केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी कल्याण येथे केले. (Kapil Patil Latest Marathi News)

निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने कपिल पाटील यांच्याशी चर्चासत्र चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी आपला राजकीय प्रवास, त्यातील आठवणीतले मजेदार किस्से सांगितले. महागाई, ओबीसी आरक्षण याविषयी केंद्र सरकार नाही तर राज्य सरकार जबाबदार आहे. केवळ जनतेची दिशाभूल करायची काम करीत आहेत. मात्र, जनता सुज्ञ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आखलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढेल व जिंकेल असे ते म्हणाले.

Kapil Patil Latest Marathi News
राज्यसभेचं मैदान मारून पैलवान कोल्हापुरात परतला; महाडिकांनी आठ वर्षांनी उधळला गुलाल

राज्यसभा निवडणूक निकलानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका करताना आमच्या हातात ईडी असती तर आम्हाला ही मते मिळाली असती अस वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना संजय राऊत यांना इडीमुळे मते मिळाली का, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला विजय हा देवेंद्र फडणवीस यांच्या स्ट्रेटेजीचा आहे. राऊत यांना निवडणूक स्ट्रेटेजी आणि निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे की नाही याचा विचार करण्याची गरज आहे.

स्वतःची हार कुणाच्यातरी पाठीमागे लपवण्याचे काम करण्याची त्यांची पहिल्यापासूनची भूमिका आहे. अशाप्रकारे काही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवणार, यामध्ये ईडी चा प्रश्न आला कुठून. त्यांच्या दोन आमदारांना उच्च न्यायालयाने सुद्धा मतदानाचा हक्क नाकारला, उच्च न्यायालयाने सुद्धा इडीच्या सांगण्यावरून चालते का? असा सवाल पाटील यांनी केला. पुढे बोलताना पाटील यांनी राऊत यांनी न्यायालय भाजपच्या माणसांना जामीन देत आम्हाला नाकारत असे वक्तव्य केले होते. त्यांना आता सवय झाली काही नाही झाले की ते केंद्र सरकार आणि भाजप कडे बोट दाखवायच यापलीकडे ते काही भाष्य करत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यसभा निवडणूक निकालानंतर महविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अपक्ष आमदारांना निधी देताना विचार करू अस वक्तव्य केले होते. याविषयी पाटील म्हणाले, अशा प्रकारे वक्तव्य करणारे मंत्री विधानपरिषदेत भाजपचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सहाय्य करतील असा याचा अर्थ आहे. राज्यसभा निवडणुकीत जी काही मते भाजपच्या पारड्यात पडली ती महाविकास आघाडी सरकारवर नाराज असलेल्या आमदारांची होती.

वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आणखी आमदार आमच्या बाजूने येत मतदान करतील, अपक्ष आमदारावर दबाव आणण्याचे काम आघाडी सरकारचे सुरू आहे. देशात लोकशाही आहे राज्यात लोकशाही आहे की नाही याबाबत विचार करावा लागेल. आघाडी सरकारमधील मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ते दुर्दैव आहे. अपक्ष आमदार या वक्तव्याचा विचार करतील आणि भाजपला मतदान करतील, असेही ते म्हणाले. (Kapil Patil Latest Marathi News)

Kapil Patil Latest Marathi News
'मविआ'च्या दोस्तीला नजर; विधानपरिषदेला 'तुझं तु-माझं मी' म्हणतं शिवसेनेचा सावध पवित्रा

नवी दिल्ली येथे अखिल भारतीय लवणकार समाजाचे राष्ट्रीय संमेलन सोमवारी होणार आहे. यावेळी नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाला आगरी समाजाचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह समाजाकडून केला जात आहे. त्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढविण्यासाठी मेळाव्यात चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in