जा आणि रडत बस ; वरुण गांधींना कंगनाचं प्रत्युत्तर

भाजपचे खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी कंगनावर (Kangana Ranaut) हल्लाबोल करुन नाराजी व्यक्त केली होती. वरुण गांधींना कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे.
Kangana Ranaut, varun gandhi
Kangana Ranaut, varun gandhisarkarnama

नवी दिल्ली : '१९४७ साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे,' असे विधान अभिनेत्री कंगना राणावत हिनं केलं आहे. तिच्या या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही तिच्या या विधानानाचा समाचार घेतला आहे.

भाजपचे खासदार वरुण गांधी (varun gandhi) यांनी कंगनावर (Kangana Ranaut) हल्लाबोल करुन नाराजी व्यक्त केली होती. वरुण गांधींना कंगनानं प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना आपल्या विधानावर ठाम आहे. 'जा आणि रडत बस'अशी खिल्ली कंगनाने वरुण गांधीची उडवली आहे. कंगनाने वरुण गांधी यांना इन्स्टाग्रामवर उत्तर दिले आहे, कारण तिचं ट्विटर अकाऊंटवर बंदी आहे.

कंगना म्हणाली, मी १८५७ सालच्या देशाच्या पहील्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख केला होता. जो अयशस्वी झाला. त्यावेळी आपल्याला ब्रिटीशांची क्रूरता आणि अत्याचार सहन करावे लागले होते. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनंतर गांधीनी भिक मागितल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. जा आणि रडत बस असेही तिने वरुण गांधींना म्हटले आहे. तिनं वरुण गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

कंगणावर निशाणा साधत काल वरुण गांधी म्हणाले होते की, कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह ,चंद्रशेखर आजाद, नेताची सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांचा तिरस्कार. या विचारसरणीला वेड म्हणायचं की देशद्रोह ?

Kangana Ranaut, varun gandhi
परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठी CIDच्या हालचाली सुरु

'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.' असं विधान कंगनानं केलं आहे. ती एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होती.

कंगनाच्या (Kangana Ranaut)या विधानाचा समाचार शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे (Shiv Sena Leader Nilam Gorhe) यांनी घेतला आहे. निलम गोऱ्हे म्हणाल्या, ''राष्ट्रवतींनी कंगना राणावत हीला नुकताच पदम पुरस्कार प्रदान केला आहे. त्यानंतर तिनं अत्यंत बेजबाबदर,निराधार आणि स्वातंत्र्य योधांचा अपमान करणारे विधान केले आहे. त्याचा मी निषेध करते. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी कंगना राणावतने 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन संपरपित करणाऱ्या योध्यानच अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला त्यामुळे तिचा पदम पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करीत आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com