
Kangana Ranaut Political Entry : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. अलीकडच्या काळातील तिने केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. कंगना राजकारणात येणार असल्याच्या चर्चाही सुरु होत्या. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात येण्यासंदर्भात भाष्य केलं आहे. (Kangana Ranaut said, I will definitely enter politics if the country needs it)
देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. ''मला समाजकार्याची आवड आहे. राजकारणात काम करण्यासाठी मी पात्र आहे की नाही हे जनता ठरवेल. हा निर्णय मी जनतेवर सोपवला आहे. तोपर्यं मी अभिनय क्षेत्रात काम करत राहणार. पण देशासाठी राजकारणात काम करायण्याची संधी मला मिळाली तर मी नक्कीच देशाचा विचार करुन, राजकारणात प्रवेश करेल. जर मला कोणी राजकारणात येण्याची ऑफर दिली तर मी नक्कीच या गोष्टीचा विचार करेल", असंही कंगनाने यावेळी सांगितलं. (Kangana Ranout News)
दरम्यान, ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तिच्या घराचा काही भाग पाडला होता. यावरही तिने तिखट प्रतिक्रीया दिली."माझं घर अशाप्रकारे पाडलं जाईल असा मी कधीच विचार केला नव्हता. सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडलं". मी कोणत्या व्यक्तीची बाजू घेऊन बोलत नाही. माझं नुकसान होत असलं तरी देशाचा विचार करुन एखाद्या गोष्टीवर मी माझं मत व्यक्त करत असते.अनेकांना माझी मते खटकतात. पण माझी लढाई ही एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांविरुद्ध आहे, असंही तिने यावेळी सांगितलं. (Kangana Ranout Enter in Politics)
यावेळी तिने बॉयकॉट ट्रेंडवरही भाष्य केलं.देशाची लोकसंख्येपैकी अगदी एक टक्के लोक सोशल मिडीयावर असतात. त्यातही खुप कमी लोक बॉयकॉट ट्रेंड सुरू करतात. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंडचा सिनेमावर परिणाम होतो, असं मला वाटत नाही. आज अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी झाले. या माध्यमातून ते आज कोट्यवधी रुपये कमवत आहेत.पण मी अगदी कामापुरता सोशल मीडियाचा वापर करते. असंही कंगनाने यावेळी सांगितलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.