'स्वातंत्र्याची कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी, पण...'

१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले, असं वक्तव्य तिने एका मुलाखतीत बोलताना केले होते.
Padma Shri Dr. Ravindra Kolhe
Padma Shri Dr. Ravindra KolheSarkarnama

सोलापूर : 'स्वातंत्र्याची कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. आज ही अनेक लोक पारतंत्र्यातच. मात्र, कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करतो,' असे म्हणत पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे (Padma Shri Dr. Ravindra Kolhe) यांनी आपली भुमिका मांडली आहे. डॉ. रविंद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे हे सध्या सकाव फाउंडेशन आयोजित व्याख्यानमालेसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कंगना (Kangana Ranout) आणि विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्याबाबत भुमिका मांडली आहे.

Padma Shri Dr. Ravindra Kolhe
'स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही'

अभिनेत्री कंगना राणावतने भारताच्या स्वातंत्र्याविषयी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. तर कंगनाच्या याचं वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं. मात्र, पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे यांनी कंगनाच्या त्या विधानाचं निषेध केल आहे. ''स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळ्या आहेत. पण जेव्हा ब्रिटिशांचा ब्लॅक युनियन उतरला आणि आपला तिरंगा चढला तेव्हाच स्वातंत्र्य मिळालं. दरम्यान, आज ही अनेक लोक हे पारतंत्र्यातच आहेत. गरीब, दीनदुबळे, अनाथ, अपंग, वृद्ध, मूकबधिर, आदिवासी, भटके यांना स्वातंत्र्य मिळालं का? हा आज ही प्रश्नचिन्ह आहे.

जो मनुष्य रात्री उपाशी झोपतो तो निश्चितच हा विचार करतो, हेच का स्वातंत्र्य? यासाठीच का माझ्या वाडवडिलांनी आत्मबलिदान केलं? ज्यांच्यासाठी हे स्वातंत्र्य मिळालं त्यांच्यापर्यंत पोटभर अन्न मिळतं नसेल तर हे सुद्धा निषेधार्य असल्याचं डॉ. रविंद्र कोल्हे म्हणतात.

Padma Shri Dr. Ravindra Kolhe
काही राजकीय पक्षाचे घटक नैराश्यातून बंदचा निर्णय घेतात हे दुर्दैव!

काय म्हणाली होती कंगना राणावत?

अभिनेत्री कंगना राणावत (Kangna Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "१९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले" या आपल्या वक्तव्यावरुन कंगना आता वादात सापडली आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या एका परिषदेत बोलताना तिने हे वक्तव्य केले होते.

- विक्रम गोखले काय म्हणाले?

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काल (14 नोव्हेंबर) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे. योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळचे मोठमोठे लोक त्या योद्ध्यांना फाशी जाताना बघत राहिले. पण त्यांनी या लढ्यातील योद्ध्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,”असे विक्रम गोखले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com