ठाकरेंची एक शाखा ताब्यात तर दुसरी जमीनदोस्त; राजकारण तापले

Kalyan-Dombivali News : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांनी शाखेच्या ठिकाणी येऊन पालिकेच्या विरोधात निदर्शने केली.
Kalyan-Dombivali News
Kalyan-Dombivali NewsSarkarnama

Kalyan-Dombivali News : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात गेल्या सतरा वर्षापासून एका भूखंडावर असलेली शिवसेना (Shiv Sena) (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या समर्थकांची शिवसेना शाखा शनिवारी कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) पालिकेच्या प्रभागा अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. यावरुन आता कल्याण-डोबिंवलीत राजकारण तापले आहे.

या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थकांनी शाखेच्या ठिकाणी येऊन पालिकेच्या विरोधात निदर्शने केली. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळेच पालिकेनेही ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला. मागील १७ वर्षात ज्या शाखेवर कधी कोणी अनधिकृत म्हणून कारवाई केली नाही ती शाखा आता पालिकेला आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना अनधिकृत कशी वाटू लागली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे समर्थकांनी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि त्याचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना लक्ष्य केले.

Kalyan-Dombivali News
ऐकावे ते नवलच! बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलीचे नाव ठेवले 'शिवसेना'

विठ्ठलवाडी भागात शिवसेनेची अनेक शाखा आहे. या शाखेतून जनसंपर्काची कामे केली जात आहेत. बगीचाच्या राखीव भूखंडाच्या भागावर इतर बांधकामांमध्ये ही शाखा आहे. अचानक या भूखंडाच्या बाजुला असलेली शिवसेना शाखा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पालिकेला अनधिकृत का वाटली, असे प्रश्न ठाकरे समर्थकांनी उपस्थित केले.

पालिकेच्या कारवाई विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. या वेळी रमाकांत देवळेकर, महिला आघाडीच्या विजया पोटे, आशा रसाळ अनेक महिला, पुरुष उपस्थित होते. शाखेच्या जागेवर शिंदे समर्थकांचा डोळा होता. त्या रागातून आणि आकसाने ही कारवाई केली, असा आरोप देवळेकर यांनी सांगितले. दबावाचे राजकारण करुन राजकारण यशस्वी होत नसते, याची खूणगाठ संबंधितांनी बांधून ठेवावी, असे शिवसैनिकांनी सांगितले.

३९ गुंठे क्षेत्र असलेल्या बगिचा आरक्षणावरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवून पालिकेने याठिकाणी बगिचा विकसित करावा, अशी मागणी कल्याण शहर प्रमुख शरद पाटील यांनी केली होती. या बांधकामासह आणखी चार बांधकामधारकांना बांधकामे हटविण्यासाठी नोटीस दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे जे प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी सांगितले.

Kalyan-Dombivali News
मुंडे बंधु-भगिनी पुन्हा भिडणार; 2024 ची लिटमस टेस्ट

दरम्यान, डोंबिवलीतील मध्यवर्ती शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन खासदार शिंदे आणि ठाकरे गटामध्ये वाद झाला होता. अखेर त्या शाखेचा ताबा शिंदे यांच्याकडे गेला. आता कल्याणमध्ये शाखाच जमीनदोस्त केल्याने ठाकरे समर्थक संतप्त झाले आहेत. शिंदे समर्थकांनी मात्र यात मुख्यमंत्री, खासदार यांचा कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in