मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी पडवींचा फडणवीसांना इशारा - K C Padavi criticize Devendra Fadnavis over Khawti scheme kit | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मी तोंड उघडल्यास महागात पडेल! के. सी पडवींचा फडणवीसांना इशारा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

राज्यात कमकुवत असलेल्या काँग्रेसमध्येच सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे.

नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. भाजपच्या काळात या विभागात मोठा भ्रष्टाचारा झाला असून मी तोंड उघडल्यास महागात पडेल, असं पडवी म्हणाले आहेत. विभागाकडून सध्या चांगलं काम होत असल्यानं फडणवीस आदिवासी खाते आणि मला बदनाम करत असल्याचा आरोप पडवी यांनी केला आहे. (K C Padavi criticize Devendra Fadnavis over Khawti scheme kit)

विधीमंडळ अधिवेशनदरम्यान फडणवीस यांनी विधानसभेबाहेर खावटी अनुदान योजनेतील किट दाखवले होते. या किटमध्ये भेसळ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा आरोप पडवी यांनी फेटाळून लावला आहे. फडणवीस यांनी दाखवलेले किट बनावट असल्याचा दावा पडवी यांनी केला आहे. बाजारातून सुट्टे तेल आणि माल खरेदी करून  मीडियासमोर सादर केल्याचा आरोपही पडवी यांनी केला.

हेही वाचा : Thank You Modiji : इंधन दरवाढीवरून वाहन चालकांची भन्नाट शक्कल!

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून चांगलं काम होत आहे. त्यामुळं फडणवीसांकडून आदिवासी खाते आणि मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. भाजपच्या काळात या विभागात भाजपच्या काळात मोठे भ्रष्टाचार झाले आहेत. मी तोंड उघडल्यास भाजपाला महाग पडेल, असा इशारा पडवी यांनी दिला आहे. 

दरम्यान, राज्यात कमकुवत असलेल्या काँग्रेसमध्येच सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या पक्षात मानापमानाचे आणि आव्हान देण्याचे प्रयोग सुरू झाले आहे. राज्य मंत्रीमंडळातून दोघांना डच्चू मिळण्याच्या चर्चेने आता गंभीर वळण घेतले आहे. काँग्रेसमधील या घडामोडींकडे भाजप लक्ष ठेवून आहे. 

हेही वाचा : सरकार पडेल असं रोज सकाळी वाटंत पण संध्याकाळ होईपर्यंत टिकतं!

'राजीनामा हवा असेल तर तो ९ किंवा १५ ऑगस्टला घ्या,‘ अशा शब्दांत पडवी यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले आहे. हे खाते आपल्याकडेच राहील, याची खात्री त्यांनी जाहीरपणे देत आपल्या पदाला धोका नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे विदर्भातील तीन मंत्री वेगवेगळ्या कारणांनी टेन्शनमध्ये आहेत. 

या बातमीला पडवी  (K. C. Padvi) यांनी दुजोरा दिला आहे. तसेच माझ्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असली तरी आदिवासी विकास खाते माझ्याकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी केला. माझ्याबाबतीत उलट सुलट चर्चा आहे. मी सात वेळा निवडून आलो. तसेच यापुर्वी मंत्रिपदही नाकारले होते. यामुळे आदिवासी विकास खाते हे मला दिले आहे. ते खाते पक्षातील ज्येष्ठ म्‍हणून माझ्याकडेच राहिल, असं पडवी यांनी स्पष्ट केलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख