Jitendra Awad : आव्हाडांना दिलासा ; अटीशर्तींसह जामीन मंजूर

Jitendra Awad : . "पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते," असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Jitendra Awad : प्रेक्षकांना मारहाण करत “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आहे. दुपारी त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याबाबत आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटीशर्तींसह १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते," असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.

Jitendra Awhad
Eknath Shinde : आव्हाडांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

"माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,"असे आव्हाड म्हणाले. आव्हाडांवर न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) म्हणाले,"जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई केली ती कायदेशीर आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही किंवा हे कोणी मुद्दामहूनही केलेलं नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in