जे.पी.नड्डा यांनी मुस्लिम समाजाची वैयक्तिकरित्या माफी मागावी : राष्ट्रवादीची मागणी

NCP-BJP Politics| Mahesh Tapase| प्रेषित महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित केलं
Mahesh Tapase
Mahesh Tapase

NCP-BJP Politics latest news

मुंबई : मोहम्मद पैगंबरांचा हेतुपुरस्कर अपमान करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांना भाजप अशाप्रकारचे प्रशिक्षण देते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण मुस्लिम समाजाती वैयक्तिकरित्या माफी मागावी. भाजपने सर्व धर्माचा आदर करायला शिकावे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.

महंमद पैगंबर व इस्लाम धर्म यांच्याबद्दल कथितरीत्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित केलं. त्याआधी भाजपने (BJP) निवेदन प्रसिध्द करत भाजप कोणत्याही धर्माचा किंवा व्यक्तीचा अपमान निंदनीय असल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले आहे.

Mahesh Tapase
ही सगळी 'असली' हिंदुत्वाची लक्षणे आहेत का? मनसेनं पुन्हा डिवचलं

भाजपचे प्रवक्ते सतत विष ओकणारे. द्वेष करणारे झाले आहेत. त्यांच्या कृत्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी अशी हानी झाली आहे, असेही महेश तपासे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या एका विशिष्ट प्रवक्त्याने केलेल्या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील विधानावर तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन काही अरबी देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी तर पंतप्रधान मोदींचे छायाचित्र कचऱ्याच्या डब्यावर लावले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही महेश तपासे यांनी सांगितले.

तसेच, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून भारतीय पंतप्रधानांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि भारतीय उत्पादनांवर झालेला बहिष्कार उठवावा, अशी मागणीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com