आधी युपीए'त सामील व्हा,मग बोला; चव्हांणांनी राऊतांना झापलं

UPA| Congress| Shivsena| Ashok Chavan| युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.
Ashok Chavan on Sanjay Raut, Ashok Chavan's reply to Sanjay Raut
Ashok Chavan on Sanjay Raut, Ashok Chavan's reply to Sanjay Raut

मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच युपीए (UPA)चा सदस्य नसणार्‍यांनी यूपीएबद्दल बोलू नये, असा खोचक टोला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. "संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तीगत मत असू शकतं. पण शिवसेनेने आधी युपीएमध्ये सामील व्हावे. युपीएसंदर्भात टिप्पणी करण्यापेक्षा आधी युपीएचे सदस्य व्हावे, असही सणसणीत खोचक टोलाही अशोक चव्हाण यांनी संजय राऊतांना लागावला. (Ashok Chavan on Sanjay Raut)

"काँग्रसचे अध्यक्ष आणि यूपीएचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी केला होता. अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, "युपीएचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार हा युपीएच्याच सदस्यांना आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल युपीएमध्ये सोनिया गांधी यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Ashok Chavan on Sanjay Raut, Ashok Chavan's reply to Sanjay Raut
चंडीगड पंजाबच्या ताब्यात द्या, मुख्यमंत्री मान यांची केंद्राकडे मागणी

दरम्यान, "काँग्रसचे अध्यक्ष आणि यूपीएचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही हीच शंका आहे. पण यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला पाह्जे. परंतु, काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नाही. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील. आता यूपीएच्या जिर्णोधाराची काँग्रेसने तयारी करायला हवी, असे संजय राऊत म्हणाले होते.

गेल्या काही दिवासांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. के. चेंद्रशेखर राव यांना युपीएचे नेतृत्व करायची इच्छा नाही. परंतु, जे नेतृत्व करेल त्यांच्या पाठिशी ते खंबरीपणाने उभे राहू. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे या सर्व घडामोडींमध्ये आघाडीवर आहेत. पण यूपीए संदर्भात काँग्रेस कोणतीही हालचाल दिसत नाही, हे दुर्दैव आहे. संजय राऊत यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com