पवारांना इजा पोहोचविण्याचा प्रयत्न होता : आव्हाडांचा खळबळजनक आरोप

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला होता.
ncp, Jitendra Awhad
ncp, Jitendra Awhadsarkarnama

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मूक निदर्शने केली. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्राची माती जगायला आणि जगवायला शिकवते; त्यामुळे अराजक माजवण्याचा प्रयत्न केला. तरी महाराष्ट्राची माती हे अराजक सहन करणार नाही. पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा त्यांना इजा पोहचवण्याचा प्रयत्न होता. पवार साहेबांना शारीरिक इजा करून महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा कट रचण्यात आला होता, असा संशय आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार यांच्या घरावर शुक्रवारी एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचे राज्यभरामध्ये तीव्र पडसाद उमटेल आहे. त्यानुसार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या. या वेळी आव्हाड म्हणाले, "काल आम्ही सांगितले होते की आमचे कार्यकर्ते कायदा हातात घेणार नाही. कारण, आम्ही एसटी कर्मचार्‍यांच्या विरोधात नाही. मात्र, आज मला तीन एसटी कर्मचारी संघटनांच्या बातम्या वाचायल्या मिळाल्या. या तिन्ही संघटनांनी शुक्रवारी घडलेल्या प्रकाराचा धिक्कार केला आहे. शुक्रवारी ज्यांनी हल्ला केला. त्यापैकी अनेकांच्या रक्तामध्ये मद्याचे अंश सापडले, असेही आव्हाड यांनी सांगितले.

ncp, Jitendra Awhad
Silver Oak Attack : पवारांना पितृस्थानी मानता अन्‌ वकिली फडणवीसांची करता..? हे दुर्दैवी!

ही घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी होती. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. शुक्रवारी शरद पवार हे घरात आराम करीत होते. त्यावेळी घरामध्ये पवार यांच्या पत्नी आणि नात असे तिघेच होते. त्यावेळी या लोकांनी घरावर हल्ला केला. बाहेर जमलेली गर्दी पाहून नातीने दरवाजे बंद केले. मात्र, या हल्लेखोरांनी जर दरवाजा तोडला असता तर किती भयानक प्रकार घडला असता; आंदोलकांनी सरकारला लक्ष्य केले असते तर समजू शकतो. मात्र, 82 वर्षाच्या माणसाला लक्ष्य करुन काय साध्य करायचे होते, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. पवार यांनी कालच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते. मात्र, आम्ही सर्व गांधीवादी आहोत. आता असेच दिसून येत आहे की, महात्मा गांधींच्या हत्येच्या वेळी समाजामध्ये जे विष पेरण्यात आले होते. ते वल्लभभाई पटेल यांनी आपल्या पत्रात लिहिले होते की, गांधीजींच्या हत्येच्या आधी समाजात विष पेरण्यात आले होते. त्यातूनच गांधीहत्या झाली. आताही असेच विष पेरण्याचे काम सुरु आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.

पवारांचा द्वेष हा व्यक्तीगत स्वार्थासाठीच आहे. त्यामुळे ही विषपेरणी सुरु आहे. या घटनेनंतर भाजप नेत्याने शरद पवारांवर टीका करताना फ्रेंच राज्यक्रांतीचा दाखला दिला आहे. मात्र, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की सोळावा लुईस आणि मॅरी अँटोनी यांच्यासह 50 हजार जणांची गिलोटीनखाली मुंडकी छाटण्यात आले होते. या लोकांना महाराष्ट्रातही हेच करायचे आहे का? ज्या प्रकाराने अमरावतीमधील एक नेता बोलला आहे. महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे, असेही आव्हाड म्हणाले.

पवारांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत, असे म्हणणार्‍यांनी याचा विचार करावा की पवारांच्या नखाएवढीही आपणाला सर नाही. या महाराष्ट्राचे राजकारण पवारांभोवतीच फिरत असते, हे टीका करणार्‍याने ध्यानात घ्यायला हवे. महाराष्ट्र हा लोकशाही मानणारा प्रदेश आहे. पवारांवर प्रेम करणार्‍या चार पिढ्या आहेत. आज जे काही चालू आहे. ते भितीपोटीच आहे. 82 वर्षांच्या वृद्धाला घाबरलेले हे लोक शरद पवार यांच्यावर शाब्दीक हल्ले करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता तर शारीरिक हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपली शंका आहे की, अमरावतीमधून केलेले विधान पाहता शरद पवार यांना शारीरिक ईजा पोहचविण्याचा कट होता. नशिबाने दरवाजा तुटला नाही. अन्यथा घातपात झाला असता, अशी भितीही आव्हाड यांनी व्यक्त केली.

ncp, Jitendra Awhad
पोलिसांची निराशा ; सदावर्तेंना फक्त दोन दिवस कोठडी

पवार हे मोठ्या मनाचे आहेत. लोकांची माथी भडकावणे हा गुन्हा आहे. "सावधान शरद पवार" अशा आशयाची पोस्टर्स छापण्यात आली होती. तरीही, अशा हल्ल्यांना पवार घाबरणारे नाहीत. ते पोलिसांच्या गराड्यात रहात नाहीत. अन् जर हिमंत असेल तर फ्रेंच राज्यक्रांतीसारखी कृती करुन दाखवा, आमचे हे खुले आव्हान आहे. जनताच आता कोणाचे वाईट दिवस आले आहेत, हे दाखवून देईल, अशा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आनंद परांजपे यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांनाही धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी ही मूक निदर्शने करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जल्लोष करुन दुसर्‍या दिवशी नक्की काय घडले, याचा शोध पोलीस घेतीलच, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com