खुनाचा गुन्हा चालला असता पण ३५४ गुन्हा मान्य नाही

Jitendra Awhad | माझ्याविरोधात षडयंत्राचा हा भाग आहे
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

मुंबई : मला खुनाचा गुन्हा चालला असता पण ३५४ गुन्हा मान्य नाही. महिलेने तक्रारीत जे शब्द वापरले ते शब्दांवर माझा आक्षेप आहे. समाजात माझी मान खाली गेली. विनयभंगासारखा गुन्हा आयुष्यात केला नाही. माझ्याविरोधात षडयंत्राचा हा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ३७६ आणि ३५४ साठी मी जन्माला आलो नाही, विनयभंगाचा हा गुन्हा माझ्या काळजाला लागला. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात होऊ नये, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. महाराष्ट्रात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण होत आहे. त्यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं, अशा राजकारणाने घरं उध्वस्त होतील, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Jitendra Awhad
Ajit Pawar News : 'तिथे विनयभंंगासारखं काहीही घडलं नाही, पण...'

जितेंद्र आव्डाड यांच्याविरोधात भाजप पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणावर खुलासा केला आहे. गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडताना धक्काबुक्की होत असते. जितेंद्र आव्हाडांची यांनीदेखील त्या महिलेला बाजूला केले. मग त्यांची ही कृती विनयभंगाच्या व्याख्येत कुठे बसते, मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यांसमोर पाच-सहा फुटांवरही घटना घडली, मग गृहविभागाने याची दखल का घेतली नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

याचवेळी त्यांनी संबंधित तक्रारदार महिला रिदा राशिद यांचा आव्हाड यांच्यासोबत असलेला एक जुना व्हिडीओ दाखवला. यात आव्हाड यांनी या महिलेला बहिण म्हणुन संबोधल्याचही दाखवलं. त्यानंतर त्यांनी विनयभंगाचे कलमही वाचून दाखवले. विनयभंगाची व्याख्या वाचून दाखवल्यानंतर त्यांनी थेट पोलीस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडताना धक्काबुक्की होत असते. मग आव्हाडांची कृती विनयभंगाच्या व्याख्येत कुठे बसते, असा सवाल जयंत पाटील यांनी पोलिसांना विचारला आहे. इतकेच नव्हे तर, पोलिसही एका प्याद्याप्रमाने वागत असतील तर कायदा सुव्यस्थेवर जनतेचा विश्वास राहणार नाही. असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्याचवेळी, हरहर महादेव चित्रपटाबाबत आव्हाड यांनी घेतलेल्या भुमिकेला राष्ट्रवादीच कॉंग्रेसचं पूर्ण समर्थन आहे. पण याच रागातून सरकारने त्यांच्या विरोधात ही कृती केली. आता शिंदेंनीच सांगावं, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com