सत्तेची उब मिळाल्याने आव्हाडांना ओबीसींचा विसर

ओबीसींवर मला विश्वास नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते
 Pratik karpe - jitendra Avhad 

 Pratik karpe - jitendra Avhad 

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सत्तेची उब मिळाल्याने ते आता ओबीसींना विसरले आहेत. त्यामुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते, अशी ओबीसींबाबत अपमानकारक विधाने करत असल्याची टीका भाजप राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे Pratik Karoe0 यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान कार्यक्रमात, मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी (OBC) नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढले नाहीत, तेव्हा लढले ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचं नसतं. ओबीसींवर ब्राह्मणी पगडा असल्याचा टीका केली होती. त्याला प्रतीक कर्पे यांनी पलटवार केला आहे.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Pratik karpe - jitendra Avhad&nbsp;</p></div>
पुणे जिल्हा बँकेत भाजपचा प्रवेश; अजित पवारांची 'ती' भीती खरी ठरली!

आव्हाड हे मुळात मुंब्र्यासारख्या मतदारसंघातून निवडून येत असल्याने आपल्याला मतांसाठी ओबीसींची गरजच नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. जितेंद्र आव्हाडांना ओबीसींपेक्षा वादग्रस्त व्यक्तींवर आव्हाड यांचा जास्त विश्वास आहे हे समाजाचे दुर्दैव असल्याचे प्रतीक कर्पे यांनी म्हटले आहे. तर सत्तेतील तिनही पक्षांना ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नसल्याचे दिसून येत आहे. त्याचमुळे आव्हाडांकडून ओबीसींवर टीका होणे अपेक्षितच आहे. या रुग्णवाहिकेला ओबीसी समाजातील मोठ्या लोकांचे नाव देण्याचा मोठेपणा आव्हाड यांना दाखवता आला नाही, यातच सर्वकाही दिसून येते, असा टोलाही प्रतीक कर्पे यांनी लगावला आहे.

तसेच, आघाडी सरकारमधील घटक पक्षांतील समन्वयाच्या अभावामुळे मराठाआरक्षणानंतर ओबीसी आरक्षणही बासनात गुंडाळण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. इतकेच नव्हे तर ओ बीसी आरक्षण कायमचे गोठविण्याचाही ठाकरे सरकारचा कट रचला आसल्याचा आरोप प्रतीक कर्पे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही भुमिका घेतल्याने आव्हाड यांच्यासारखे मंत्रीही असे बोलणार हे निश्चितच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com