'कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही,' जितेंद्र आव्हाड संतापले

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो', या मालिकेतून अभिनेता किरण माने या अभिनेत्याला काढून टाकण्यात आले.
Kiram Mane- Jitendra Avhad
Kiram Mane- Jitendra Avhad

मुंबई : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'मुलगी झाली हो', या मालिकेतून अभिनेता किरण माने (Kiran Mane) या अभिनेत्याला काढून टाकण्यात आले. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार मांडल्यामुळेच आपल्याला या मालिकेतून काढण्यात आल्याचे किरण मानेंनी सांगितले आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातूनही संताप व्यक्त केला जात आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला आहे. जर कोणाच्या भाकरीवर टाच आणाल तर योग्य नाही. याद राखा, असा इशाराच जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिला आहे. (Kiran Mane latest News)

Kiram Mane- Jitendra Avhad
तीन मंत्री आणि चौदा आमदारांनी राजीनामे देताच मोदी अॅक्शन मोडवर..

जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी ट्विट आपली भूमिका मांडली आहे. ''स्टार प्रवाह चॅनेलवरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील विलास पाटील पात्र साकारणा-या किरण माने या अभिनेत्याला फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मिडीयावर लिहीतो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले गेले.

या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे,निलु फुले या कलाकारांनी कधी टिका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला. याद राखा, हा महाराष्ट्र वैचारीक वारसा जोपासत तुमच्या विरोधात लिहीले म्हणून तुम्ही जर कोणाच्या भाकरीवर टाच आणणार असाल तर ते योग्य नाही.''

Kiram Mane- Jitendra Avhad
राणेंच्या धक्कातंत्राने दळवी अध्यक्ष बनले...पण लगेच `गायब`ही झाले

किरण माने काय म्हणाले?

सकाळ'शी बोलताना किरण माने यांनीही आपली भूमिका मांडली. ''शिवबा-तुकोबांच्या आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडलं आहे. ही झुंडशाही आहे. खरं तर महाराष्ट्रात (Maharashtra) अशी झुंडशाही खपवून घेतली जाऊ नये. यात जर मला न्याय मिळाला नाही तर यापुढे कोणाही झुंडशाहीविरोधात बोलायची हिंमत करणार नाही. पण मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, आता काय करायचंय, हे लोकांनी ठरवायचं आहे. माझ्या सगळ्या पोस्ट्स वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही.

आम्ही जेव्हा नाटकात काम करताना काँग्रेसवर, इंदिरा गांधींंवर, राजीव गांधींवरही टीका करायचो. तेव्हा काँग्रेस नेतेही टाळ्या वाजवायचे. पण तेव्हा तुम्ही आमच्यावर टीका करु नका अशाप्रकारची दहशत नव्हती. पण आता एक जरी वाक्य जरी लिहलं तरी 'तुम्ही असं कसं लिहू शकता' म्हणत दहशत माजवण्याचे काम सुरु आहे.

सुरुवातीला मलाही बरंच ट्रोल केलं गेलं. बरीच घृणास्पद टीकाही केली,त्यावेळी मी चिडून काही वक्तव्ये त्या ट्रोलर्सच्या विरोधात केली. पण कधीही कुणाचं नाव घेऊन अर्वाच्य शब्दात काही बोललो नाही. मला वाटलं, अशाप्रकारची झुंडशाही बिहार-यूपीमध्ये असेल, पण महाराष्ट्रातही ही झुंडशाही सुरु झाली आहे आणि मी या झुंडशाहीला बळी पडलो. पण हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे. हे मी आयुष्यभर लक्षात ठेवीन," असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com