आव्हाड वैतागले; श्रीकांत शिंदेंना धुणे कुठे धुवायचे याचा दिला सल्ला!

Jitendra Awhad | मागील काही काळापासून सातत्याने तीन पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत.
आव्हाड वैतागले; श्रीकांत शिंदेंना धुणे कुठे धुवायचे याचा दिला सल्ला!
Jitendra Awhad Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) मागील काही काळापासून सातत्याने निधी वाटपावरुन तीन पक्षांमध्ये कुरबुरी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस निधी वाटपात डावलत असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहुन केला आहे. त्यात नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सातारा जिल्ह्यात निधी वाटपात शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप केला होता. (Jitendra Awhad Latest News)

दरम्यान आता या कुरबुरींवर वैतागत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना समजुतीचा सल्ला दिला आहे. अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपण आघाडीच्या सरकारमध्ये असतो, तीन पक्ष मिळून आपण काम करत असतो, तेव्हा शब्दांना मर्यादा घालाव्या लागतात. मी हे मानणारा माणूस आहे की आपण तिघे एकत्र आहोत, त्यामुळे आपले कपडे जनतेत जाऊन घाटावर धुवायचे नसतात, असेही आव्हाड म्हणाले.

काय म्हणाले होते श्रीकांत शिंदे?

महाविकास आघाडी स्थापन होताना जी त्रिसूत्री ठरली होती, त्यामध्ये निधीचं समान वाटप करण्याचं ठरलं होतं. तसंच एखाद्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा पालकमंत्री असेल त्या पक्षाला ६० टक्के आणि अन्य २ पक्षांना २०-२० टक्के निधी देण्याचं ठरलं होतं. पण सातारा जिल्ह्यात हा नियम पाळला जात नसून शिवसेनेला डावललं जात असल्याचा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता.

शिवाय याबाबत आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे शिंदे म्हणाले होते. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आव्हाड यांच्या या सल्ल्यावर शिवसेनेकडून पुन्हा काय प्रतिक्रिया येते, हे पाहावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in