शिवसेना नेत्यांच्या मनातील ओळखला मी काही ज्योतिषी नाही :आव्हाडांच्या वक्तव्यावर शिंदेंचे उत्तर

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीबाबत जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया
Eknath Shinde-Jitendra Awhad
Eknath Shinde-Jitendra AwhadSarkarnama

कल्याण : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्याबाबत खुद्द मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र, त्यांच्या मनात काय आहे, हे ओळखला मी ज्योतिषी नाही, असे राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वक्तव्य केले. त्याला शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ‘राज्यात आघाडी आहे, तर खालीही आघाडी व्हायला हरकत नाही’ असे उत्तर दिले. (Jitendra Awhad &Eknath Shinde commented on the Shiv Sena-NCP alliance)

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा आज (ता. १२ फेब्रुवारी) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुधीर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहनही केले.

Eknath Shinde-Jitendra Awhad
राष्ट्रवादीच्या मैत्रीपूर्ण लढतीत आमदार राहुल कुल यांच्या हाती सत्तेची चावी!

केडीएमसी निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी होणार का, या प्रश्नावर बोलताना ‘आघाडी धर्म पाळणं, हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडीधर्म पाळतोय. आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र, त्यांच्या मनात काय आहे, हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही, असा चिमटाही आव्हाड यांनी शिवसेना नेत्यांना काढला.

Eknath Shinde-Jitendra Awhad
राजकारण बाजूला ठेवत भाजप उपाध्यक्षाने केला आमदार अशोक पवारांचा सत्कार!

मलंगगड येथील म्हात्रे पाडा येथे नगरसेवक महेश गायकवाड यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट मॅचला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाण्यासाठी जे जे प्रयत्न केले पाहिजेत, ते सरकारच्या माध्यमातून नक्की केले जातील. महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे, त्यामुळे स्थानिक  पातळीवर देखील तेथील परिस्थिती लक्षात घेऊन नक्कीच आघाडी केली जाईल. आपण नगरपंचायतमध्येही काही ठिकाणी आघाडी केली होती, त्यामुळे वरती आघाडी आहे, त्यामुळे खालीदेखील आघाडी व्हायला काही हरकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com