अमोल कोल्हेंवर जितेंद्र आव्हाड संतप्त ; नथुरामाची भूमिका स्वीकारणं हे चुकीचं

'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत.
Amol Kolhe,Jitendra Awhad
Amol Kolhe,Jitendra Awhadsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी WHY I KILLED GANDHI या सिनेमामध्ये नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्याच पक्षातल्या नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,''

नथुरामाचे उदात्तीकरण करणाऱ्याच्या मी निषेध व्यक्त करतो. कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता तेव्हा तुमची भूमिका बदलत नाही. कलाकार आणि माणूस म्हणून दोन भूमिका असू शकत नाहीत. माहित नसलेली भूमिका करणं वेगळं असते, म्हणजे गब्बरसिंग हा माहित नव्हता, गब्बरसिंग कल्पनेने निर्माण केलेले पात्र आहे. पण जेल्हा तुम्हा महात्मा गांधी, नथूराम गोडसे साकारतात तेव्हा हे व्यक्तीमत्व सर्वांना माहित आहे. जेव्हा तुम्ही नथुरामाची भूमिका साकारतात, तेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये नथुराम आणतात, तुम्ही गांधींवरती गोळ्या झाडणार ना. तेव्हा तु्म्हाला काहीच वाटणार नाही का,'' असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

''जो कुणी नथुरामाचे उदात्तीकरण करेल मी त्यांच्या विरोधात असेल, वैचारीकदृष्या मी त्याचा विरोध करतो. ही माझी वैयक्तीक भूमिका आहे. गांधीविरोधात जेव्हा एखादा चित्रपट, नाटक आले तेव्हा मी त्याला विरोध केला आहे. कुठलाही कलाकार एखादी भूमिका करतो, तेव्हा ती भूमिका स्वतःमध्ये उतरतो. मुळात अमोल कोल्हे ही भूमिका स्वीकारली मी मुळात चुकीची आहे,'' असे आव्हाड म्हणाले.

''मी कलाकार आहे म्हणून ही भूमिका स्वीकारली असे ते म्हणतात, पण याला काही अर्थ नाही. नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे, तो आयुष्यात निघणार नाही, जेव्हा जेव्हा महाराष्ट्र नाव निघेल, तेव्हा तेव्हा नथुरामचं नाव निघतं. हा डाग गडद होता कामा नाही,'' असे आव्हाडांनी सुनावलं. ''विनय आपटे ~शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,'' असे आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

Amol Kolhe,Jitendra Awhad
धक्कादायक : मोदी म्हणाले, बेटी बचाव, बेटी पटाव,’ नेटकऱ्यांचा हल्लाबोल

डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेली कलाकृती जरी कलाकार म्हणून केलेली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचं समर्थन आलेलं आहे, कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com