'जनमत आपल्या विरोधात...; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली शरद पवारांची आठवण

Jitendra Awhad| Sharad Pawar| 1995 साली पहिले बिगर काँग्रेस सरकार आले
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय वर्तुळात रोज काहींना काही घडामोडी सुरू आहेत. सरकार स्थापन झाले असले तरी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 20 जुलै ला राज्यातील सत्तांतराचा फैसला होणार आहे. न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा राजकीय घडामोडी आणखी वेगळ्या मार्गाला जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. (Jitendra Awhad latest news)

मात्र या घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चाही सुरु आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या उलटसुलट चर्चांना उत्तर दिलं आहे. 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देत आव्हाड यांनी तेव्हाची एक आठवण शेअर केली आहे.

Jitendra Awhad
उद्धव ठाकरेंनी मनसेचा गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न केला

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आव्हाड म्हणतात,

" 1995 साली जेव्हा पहिल्यांदा युती सरकार विजयी झाले. म्हणजे पहिले बिगर काँग्रेस सरकार आले. तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. आणि ते मुख्यमंत्री असतानाच काँग्रेस सत्तेतून बाहेर गेली. ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यावेळेस मोबाईल नव्हते. आणि बॅलेट पेपरवरती मोजणी चालू होती. त्यामुळे निकाल यायला उशीर लागत होते. निकाल जसजसे येत गेले तसे वर्षा बंगल्यावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जाणीव झाली कि काँग्रेस बहुमत प्राप्त करू शकत नाही. ठरवलं असत तर बहुमत प्राप्तही करू शकली असती.

पण, मला आठवतंय कि दुसऱ्याच दिवशी मी स्वतः वर्षा बंगल्यावर उपस्थित होतो निकाल लागण्यापासून ते मनोहर जोशी यांचा शपथविधी होईपर्यंत. साहेबांकडे गेलेले ज्येष्ठ नेते.. त्यांची नावे मी इथे लिहू इच्छित नाही. त्या सगळ्यांनी साहेबांना आग्रह करत होते कि साहेब सरकार बनवूया. आपण सरकार बनवू शकता. तेव्हा साहेबांच वाक्य होतं.. 'जनमत आपल्या विरोधात आहे. असं सरकार बनवणं योग्य नाही. त्यामुळे आपण विरोधी बाकावर बसायला हवं.'

हे वाक्य त्यांचे म्हणजेच पवार साहेबांचे आहे आहे दिल्लीचा किंवा काँग्रेस हायकमांड चा काही हि संबंध नव्हता. मी ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. साहेबांची राजकीय जीवनातली 60% वर्ष हि विरोधी बाकावर बसण्यात गेली आहेत साहेब पहिल्यांदा 1967 ला निवडून आले तेव्हा पासून आज पर्यंत ते विधी मंडळाचे नाहीतर संसदेचे सदस्य आहेत. अर्धवट माहितीच्या आधारे महाराष्ट्राची दिशाभूल करणाऱ्यांसाठी मी हे लिहीत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in