Jitendra Awhad News : शिवसेनेच्या घटनेत नेत्यांना भयंकर अधिकार; आव्हाडांचे मोठे विधान : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर...

जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयावर भूमिका मांडली.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Shiv Sena News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. त्यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष किती दिवसांमध्ये आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणार, अशी चर्चा सुरु आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयावर भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात हा निकाल असल्याचा दावा केला.

Jitendra Awhad
Anil Deshmukh Exclusive interview : तुरुंगात असताना अनिल देशमुखांनी केला होता 'हा' विचार; 'सरकारनामा'च्या मुलाखतीत मोठा खुलासा

ते मंगळवारी ठाण्यात आयोजित केलेल्या निकालावरील चर्चासत्रात बोलत होते. हे चर्चा सत्र आयोजित करताना आव्हाड म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय दिला. यानंतर सत्ताधारी व विरोधक यांच्यात निकाल आमच्याच बाजूने हे सांगण्याची स्पर्धाच सुरू झाली. या सगळ्या घाई गडबडीत सामान्य माणूस गोंधळला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय नेमके काय म्हणले, त्यांनी कोणती निरीक्षणे नोंदवली समजून घेण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केले.''

न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत आव्हाड म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वाचा शब्द येतो. पक्षाचे युवा सेना, विद्यार्थी सेना अशा विविध विभागांचा विचार करून पक्षाच्या घटनेनुसार निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेच्या घटनेमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांची एक रचना आहे. त्यात त्या नेत्यांना भयंकर अधिकार आहेत.''

Jitendra Awhad
DK Shivakumar News : कर्नाटक काँग्रेसचे किंगमेकर डी. के. शिवकुमार उतरणार मध्य प्रदेशच्या रिंगणात...; निवडणूक रणनीती ठरवणार...

''बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे चेले असलेले ज्येष्ठ वकील आदिक शिरोडकर यांच्यासह मराठी वकिलांनी शिवसेनेची घटना बनवली होती. त्या घटनेत हे काय निर्णय घेतात यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे. त्या पक्ष रचनेतील ९० टक्के नेते आजही ठाकरेंबरोबर आहे. खासदार गजानन किर्तीकर यांच्यासारखे दोन-तीन नेते गेले. त्याने फार फरक पडत नाही, असे आव्हाड म्हणाले.

''धनुष्यबाणाचा निर्णय घेताना निवडणूक आयोगाने सांगितले की, निवडून आलेले आमदार व त्यांची मते विचारात घेतली. पण पराभव झालेल्या उमेदवारांच्या मतांचा विचार का नाही करायचा? शिवसेनेचेच मतदान होते. अशास्थितीत ते मतदार कोणाबरोबर आहेत हे कसे कळणार,'' असेही आव्हाड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com