'आव्हाडांनी राजीनामा दिला; त्यांची समजूत काढण्यासाठी सांगलीहून आलो!'

Jitendra Awhad News : जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा पत्रकार परिषदेत दाखवला
Jitendra Awhad, Jayant Patil News
Jitendra Awhad, Jayant Patil NewsSarkarnama

Jitendra Awhad News : : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आव्हाड यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचे पाटील यांनी सांगितेल.

आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्यासाठी सांगलीहून आलो. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला होता. गर्दीतून वाट काढत होते. गर्दीत न जाता तुम्ही दुसरीकडे जा, असे आव्हाड यांनी सांगितले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हे दुर्दैव आहे. आव्हाड यांच्यावर लावलेली कलमे चुकीची आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

Jitendra Awhad, Jayant Patil News
NCP : आव्हाडांवरील गुन्ह्याबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ; महिला लोकप्रतिनिधी आक्रमक

ठाण्याच्या पोलिसांनी ३५४ मध्ये हे प्रकरण कसे बसवले? असा सवाल करत जयंत पाटील यांनी विनयभंगाची व्याख्या वाचून दाखवली. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था बघावी. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यावी, असे जयंत पाटील म्हणाले. पोलिसांनाही याची उत्तर द्यावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

Jitendra Awhad, Jayant Patil News
आव्हाड प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बाबत पोलीस खाते कसे चालते हे बघितल पाहिजे. सांगलीहून मुंबईला...जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी आलो...त्या महिलेला बहीण म्हणून आव्हाड यांनी संबोधन केले होते. त्यांना गर्दीत बाजूला केले, तो विनयभंग होतो का असा सवाल पाटील यांनी केला. आव्हाड यांचा राजीनामा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. हा या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in