आता ZP आणि पंचायत समित्यांचा धुरळा; १३ जुलैला होणार आरक्षण सोडत

State Election Commission : राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश जारी केला
State Election Commission Latest News
State Election Commission Latest NewsSarkarnama

पुणे : नगरपालिका आणि महानगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांमधील आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झाला आहे. ७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान याबाबतची कार्यवाही करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार ७ जुलै रोजी आरक्षण सोडतीची सूचना वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असून १३ जुलै रोजी सर्व संवर्गाच्या महिलांसाठीचे आरक्षण सोडत घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान १० मे, २०२२ रोजीच्या आदेशान्वये २५ जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या कार्यक्रमानुसार २७ जून, २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com