जयश्री पाटलांच्या अडचणीत वाढ; सवाल करणाऱ्या महिलेवर उचलला हात...

Jayshree Patil|Sharad Pawar| Mumbai Police : जयश्री पाटील यांचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जात आहे.
जयश्री पाटलांच्या अडचणीत वाढ; सवाल करणाऱ्या महिलेवर उचलला हात...
Jayshree PatilSarkarnama

मुंबई : गेल्या आठवड्यात एसटी महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी सदावर्ते दाम्पत्याच्या अडचणी वाढतांनाच दिसत आहेत. त्यात आता अॅड. सदावर्तेंच्या (Gunratna Sadavarte) पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांचा एक व्हिडीओ व्हायल (Viral Video) झाला असून त्या या व्हिडीओमध्ये कुणावर तरी हात उचलतांना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये क्रिस्टर टॉवरमधील एक महिला म्हणतेय की तू तिला मारलंय. त्यावर जयश्री पाटील या एक महिलेच्या अंगावर धावून जाताना दिसतायत. यावेळी मोठा गोंगाट ऐकायला मिळत असून लहान मुलीच्या रडण्याचा आवाजही ऐकायला मिळत आहे.

या प्रकाराबाबत अद्याप मात्र काही कळू शकले नाही. मात्र, सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यामुळे जयश्री पाटीलांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jayshree Patil
'राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होतेय'

जयश्री पाटीलांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पथकं तैनात केलेली असून सदावर्तेंना झालेल्या अटकेनंतर त्यांनी पोलिस संरक्षण सोडले होते. त्यानंतर पोलिसांकडून जयश्री पाटीलांचा शोध घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. च्या सद्ध्या कुठे आहेत याबाबत माहिती मिळाली नसून त्यांनी आपले पती गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यावर पोलिस संरक्षण का सोडल याबातही स्पष्टता नाही. दरम्यान, जयश्री पाटीलांनी अटपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

Jayshree Patil
राज ठाकरेंना आता मोदी सरकारकडून विशेष सुरक्षा? केंद्रीय पातळीवर हालचाली

दरम्यान, पवारांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी अचानक एसटी कामगारांनी चप्पल फेकून घोषणाबाजी केली होती. यानंतर मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अचानक घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात असून याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. सध्या या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी केला जात असून या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरुवातील गुणरत्न सदावर्तेंना ताब्यात घेतलं होते. त्यानंतर आता त्यांना एका वेगळ्या प्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. दुसरीकडे सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटीलांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात असून, त्यांनाही पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच हा जयश्री पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता याप्रकरणी पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.