Jayant Patil News : जयंत पाटलांचे 'एमपीएससी'ला पत्र; विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्याची मागणी

MPSC News : सहाय्यक लिपीक व टंकलेखक पदासाठी कौशल्य चाचणी
MPSC, Jayant Patil
MPSC, Jayant PatilSarkarnama

Jayant Patil's Letter to MPSC : ऑनलाईन चाचणीत फार कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करवा लागला आहे. त्यामुळे फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच पुन्हा कौशल्य चाचणी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. याबाबत पाटील यांनी 'एमपीएससी'ला पत्र पाठविले आहे. (MPSC News)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) गट-क अंतर्गत सहाय्यक लिपीक व टंकलेखक या पदांकरिता परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणीदरम्यान काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर आयोगाने उपस्थित असलेल्या सर्वच उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पत्रकही आयोगामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. (Jayant Patil on MPSC Dicision)

MPSC, Jayant Patil
Cabinet Expansion : अखेर मुहूर्त ठरला ! रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होणार; 'या' आमदारांची नावे चर्चेत..

आयोगाच्या या निर्णयामुळे ज्या उमेदवारांना चाचणीदरम्यान कसलीही अडचण आली नाही, ज्या उमेदवारांची चाचणी यशस्वी पार पडली आहे, त्यांचा त्रास वाढविणारी ठरणार असल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 'एमपीएससी'चे लक्ष वेधले.

MPSC, Jayant Patil
DK Shivkumar News : ‘माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हायकमांडच्या निर्णयावर समाधानी नाही’ : डीकेच्या खासदार भावाची प्रतिक्रिया

जयंत पाटील म्हणाले, "टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणीदरम्यान फार कमी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांचीच चाचणी पुन्हा घ्यावी. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून त्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा द्यावा."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com