जेव्हा जयंत पाटील लोकलने प्रवास करतात...

विद्यार्थी दशेतील लोकल (Mumbai Local) प्रवासाच्या आठवणींना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला उजाळा.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मुंबई : पक्षाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) ते उल्हासनगर (Ulahasnagar) असा लोकलने (Mumbai Local) काल (ता.13 नोव्हेंबर) सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Jayant Patil
मुंबई लोकलवर बॉम्ब हल्ल्याची धमकी, सुरक्षेत केली वाढ

मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल, तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय! हाच पर्याय पाटील यांनी निवडला आणि लोकलने प्रवास केला आहे. या लोकल प्रवासादरम्यानही पाटील हे शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.

Jayant Patil
मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर

पाटील हे शनिवारी पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना बर्‍याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील लोकलने प्रवास करायचे तसेच, मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. कालच्या लोकलच्या प्रवासादरम्यान त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबतच्या चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना पाटील यांनी उजाळा दिला आहे.

हेही वाचा : कार्तिकी यात्रा : लालपरीनं पाठ फिरविल्याने वारकऱ्यांसाठी रेल्वे आली धावून!

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरला राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक येत असतात. पण यंदा एसटीचा संप सुरु असल्याने वारकऱ्यांची गैरसोय होणार असल्याची चर्चा सुरु असतानाच रेल्वनं भाविकांना सुखद धक्का दिला आहे.

यंदा लालपरीनं पाठ फिरवली असली तरी विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या मदतीला रेल्वे धावून आली आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरसाठी रेल्वे प्रशासनानं भाविकांसाठी सात नव्या रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत.

दोन वर्षांपासून यात्रा बंद होती. यंदा यात्रेला परवानगी देण्यात आली, पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. एसटीचा संपात विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकऱ्यांना यंदाची कार्तिकी वारी चुकणार का हा मोठा प्रश्न पडला होता.

रेल्वेच्या या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं कार्तिकीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठी 7 नव्या रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यात्रेदरम्यान तिकीट आरक्षणाच्या आणखी चार खिडक्‍या सुरु करण्यात आल्या आहेत.

वारकरी हे ग्रामीण भागातील असतात त्यांना लिहण्यावाचण्यास अडचण होते म्हणून अनारक्षित खडकीही उघडण्यात आली आहे. कार्तिकी यात्रेसाठी 'लातूर -पंढरपूर', 'मिरज -पंढरपूर', 'लातूर – मिरज', 'मिरज- लातूर', 'बिदर- पंढरपूर-मिरज', 'आदिलाबाद- पंढरपूर', 'नांदेड- पंढरपूर' आणि 'सांगली -पंढरपूर' या नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहणार असल्याने वारीवर मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्केच वारी भरेल अशी शक्‍यता आहे. रेल्वेनं 3 लाखांहून हजारांहून अधिक भाविक पंढरपुरात येतील, असा अंदाज प्रशासनच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com