जयंत पाटलांच्या मुलाने आयफेल टॅावरवर मुलीला प्रपोज केले... हे खुद्द पवारांनी सांगितले

पत्रकार परिषदेची सुरुवात; पवार यांनी काहीशी हटके केली.
जयंत पाटलांच्या मुलाने आयफेल टॅावरवर मुलीला प्रपोज केले... हे खुद्द पवारांनी सांगितले
Janyat Patilsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप (BJP) सरकारच्या धोरणांच्या विरोधात बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्यांना धारेवर धरले. पण त्या आधी त्यांनी एक 'गूड न्यूज' सर्वांना दिली.

पत्रकार परिषदेची सुरुवात; पवार यांनी काहीशी हटके केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसले होते. त्यांच्याकडे पाहत एक आनंदाची बातमी सांगितली. जयंतरावाच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केल्याची वार्ता त्यांनी सांगितली. थेट पॅरिसमध्ये जाऊन प्रपोज केल्याचे सांगत आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असे पवार यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

Janyat Patil
भाजपमध्ये फूट : दोन गट आले आमनेसामने अन् जुंपली

पवार म्हणाले ''बघा आमचा सर्वांचा दृष्टीकोन किती व्यापक झाला आहे. जयंतरावांच्या चिरंजीवांनी मंगळवारी संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केले. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आम्ही आता वाळवा किंवा इस्लामपूरपर्यंत (जयंतराव यांचे गाव) सीमित नाही आहोत. आम्ही पॅरिस वगैरे ठिकाणी जातो. ठिकाण इंटरनॅशनल असले तरी पण मुली डोमेस्टिक आहे. त्यामुळे त्यांचे लग्न इथेच होईल. आमची मुले कुठे जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असेही पवार म्हणाले. पवारांच्या या विधानावर पत्रकार परिषदेत एकच खसखस पिकली.

Janyat Patil
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते...यावर शरद पवार म्हणतात...

दरम्यान, केंद्राच्या यंत्रणा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहेत. त्यात आता 'एनसीबी'ची भर पडली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे याआधी विमानतळावर एक्साईज विभागात होते. तिथेही काही कथा त्यांच्या मला ऐकायला मिळाल्या, असे शरद पवार यांनी सांगितले. या एजन्सीचे मिडीया मॅनेजमेंट चांगले आहे, असा टोला त्यांनी लगावला. एनसीबीच्या विरोधात थेट शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. पवार यांनी पत्रकार परिषदेत आज बोलताना एनसीबीच्या निवडक कारवायांविषयी भाष्य केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in