हा तर रडीचा डाव; जयंत पाटलांकडून बावनकुळेंना प्रत्युत्तर
Chandrashekhar Bawankule & Jayant Patil

हा तर रडीचा डाव; जयंत पाटलांकडून बावनकुळेंना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही.

मुंबई : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बानवकुळे यांनी केला आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निवडणूक निकालानंतर असे आरोप करणे म्हणजे रडीचा डाव आहे. लोक त्याला महत्व देत नाही, अशा शब्दांत पाटील यांनी बानवकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यावरून बुधवारी बानवकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. सरकारमधील पक्षांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. जंयत पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिले आहे. पाटील यांनी गुरूवारी सकाळी सिध्दीविनायक मंदिरात येऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Chandrashekhar Bawankule & Jayant Patil
गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास NIA कडे; अमित शहांचे आदेश

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागांची संख्या वाढतेय याचा अर्थ भाजपचा जनाधार कमी झाला आहे. बावनकुळे यांचा आरोप म्हणजे रडीचा डाव आहे. निवडणूक काळात जर अशी एखादी घटना निदर्शनास आणून दिली असती तर तसे म्हणता येईल. पण आता निवडणुकीचे निकाल लागले. त्यात भाजपचा पराभव आता. आता असे आरोप करणे अयोग्य आहे. लोकंही त्याला महत्व देत नाहीत.

मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येणार का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्रित राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेतही एकत्रित लढले पाहिजे. आम्ही सरकारमध्ये एकत्रित काम करतोय. अजून त्याला वेळ आहे. पण एकत्रित येऊन लढावेत, अशी आमची अपेक्षा आहे.

Chandrashekhar Bawankule & Jayant Patil
बिहारमध्ये वादळ : यादव कुटुंबात फूट...तेजप्रताप यादव पक्षातून बाहेर

दरम्यान, जिल्हा परिषद पोटनिवडणूनक निकालाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कालच्या निवडणूकीच्या निकालात आम्ही सर्वत्र एकत्र लढलो नसलो तरी आम्हांला चांगलं यश मिळालं. आमची तिघांची मत एकत्र केली तर तो आकडा मोठा होतो आहे. आम्ही स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला होता. जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे.

Related Stories

No stories found.