
मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) 20 जुलैला सुनावणी होणार आहे. आमदारांकडून पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, मला खात्री आहे की, बंडखोरी केलेल्या आमदारांची आमदारकी रद्द होईल, असाच निर्णय न्यायालयाकडून येईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. (Jayant Patil Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर 11 जुलैला सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने खंडपीठ स्थापन केल्यानंतर सुनावणी घेण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. यावर पाटील म्हणाले, बंडखोरी केलेल्या आमदारांनी पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे मला खत्री आहे की, निवृत्ती पूर्वी ते चांगला निर्णय देतील, असेही पाटील म्हणाले.
वीज दरवाढीवरून पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. "वीजेचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहे. दर वाढ सामान्य माणसाला परवडणारी नाही. एकीकडे पेट्रोल डिझेलवर दिलासा दिला तर दुसरीकडे वीज दरवाढ केली आहे, अशी टीका जयंत यांनी यावेळी केली. तसेच आंम्ही मंजूर केलेल्या कामाला दिलेली स्थगिती उठवावी, अशी सरकारकडे मागणी केली. राज्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, एसटी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली असल्याचे पाटील म्हणाले.
लक्ष्मण माने यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी मागच्या काही वर्षात अनेक लोकांना जोडले. त्या सर्वांना घेऊन पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कायम वंचित घटकाला मदत केली. समाजात अजूनही मोठा वर्ग आहे जो मदतीपासून वंचित आहे. त्यांच्यासाठी आता माने काम करतील. लक्ष्मण माने यांनी भटक्या विमुक्त जातींसाठी चांगले काम केले. समाजाला सक्षम करण्याचे व नव्या पिढीला दिशा देण्याचे, आधार देण्याचे काम मागील 30 ते 40 वर्ष ते करत आहेत. पवार यांनी नेहमीच अशा व्यक्तींनी न्याय दिला, असे पाटील यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.