जयंत पाटील म्हणाले, माणुसकीच नातं कसं जपावं हे निलेश लंके यांनी दाखवले..

ते झोकून काम करत आहे, लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे.
Ncp Leader Jayant Patil- Mla Nilesh Lanke News Mumbai
Ncp Leader Jayant Patil- Mla Nilesh Lanke News Mumbai

मुंबई : आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवले. शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात असे सांगतानाच जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात. (Jayant Patil said, Nilesh Lanka showed how to maintain the relationship of humanity) त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले.  

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नावाची सध्या राज्यभरात चर्चा आहे. कोरोना काळात भव्य असे कोरोना सेंटर उभारत मतदारसंघातील रुग्णांची ते गेल्या काही महिन्यांपासून अविरत सेवा करत आहेत. (The name of NCP's Nilesh Lanka, MLA from Parner in Nagar district, is currently being discussed across the state.) विशेष म्हणजे बहुतांश वेळा लंके यांचा मुक्काम देखील याच कोरोना सेंटरमध्ये असतो. अगदी जेवणापासून तर रात्रीचा मुक्काम देखील लंके इथे करतात. त्यांच्या या कामाचे आणि कोरोना रुग्णांप्रती असलेली आपुलकी याची राज्यभरात चर्चा आहे.

पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले असून त्याठिकाणीच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.(Jayant Patil visited this Kovid Center.) त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली.

दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान लंके यांनी जयंत पाटील यांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात पाटील पारनेरमध्ये दाखल झाल्याने लंके भावूक झाले होते.

काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो मात्र आज भेट दिल्याने लंके यांचा अभिमान वाटतो. सर्वांची सेवा करण्याचा 'पण' त्यांनी घेतला आहे. (Good service to the common man is being done through Lanka) १४ एप्रिलपासून ते झोकून काम करत आहे, लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा लंके यांच्या माध्यमातून होत आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी  लंके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com