भाजपचे 9 की 13 आमदार संपर्कात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले

उद्या विधान परिषद निवडणूक होणार आहे
भाजपचे 9 की 13 आमदार संपर्कात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले
Jayant PatilSarkarnama

मुंबई : सोमवारी विधान परिषदेच्या (Legislative Council elections) १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या विजयासाठी मुंबईमध्ये बैठकावर बैठका सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांकडून आकडेमोड केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोठा दावा केला आहे.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. आघाडीच्या आमदारांना निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. विधान परिषदेचेच्या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून येतील हा आमचा प्रयत्न आहे. मित्र पक्षांना काय मदत करता येईल, हे आम्ही पाहत आहे, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil
आमदार विनोद अगरवाल यांनी 'मविआ'तून 12 दिवसांत मारली उडी; भाजपचे 1 मत प्लस

यावेळी पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला भाजपचे ९ की १३ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत? यावर पाटील म्हणाले, भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावर आता बोलण जास्त महत्वाच ठरणार नाही. घोडा मैदान जास्त दूर नाही, उद्याच काय आहे ते समोर येईल, असे सूचक विधान पाटील यांनी केले.

Jayant Patil
मविआने घेतला राज्यसभेचा धसका; दुसरी फेरी नकोच, ६ उमेदवारांना विजयी करण्याची रणनीती!

आघाडीतील तिनही पक्षांचे आमदार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आता बैठक सुरू होणार आहेत. राष्ट्रवादीने व्हीप जारी केला आहे. राष्ट्रवादीमध्ये कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही, मतदार संघातील विकास कामावर चर्चा झाली, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in