Jayant Patil: राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं 'ते' टि्वट, राजकीय चर्चांना उधाण

Jayant Patil On Shinde Fadnavis : ...तर निव्वळ योगायोग समजावा!
Jayant Patil, NCP
Jayant Patil, NCPSarkarnama

Jayant Patil On Shinde Fadnavis : महाराष्ट्रातील उद्योगधंदे राज्याबाहेर गेल्यानं महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली जात आहे. विरोधकांच्या आरोपांना सरकारकडून देखील जोरदार प्रत्यु्त्तर देण्यात येत आहेत. मात्र, तरीदेखील विरोधकांकडून उद्योगधंदे राज्याबाहेर जाण्यावरुन सरकारवर आरोप करणं काही केल्या थांबत नाहीये. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टि्वटद्वारे निशाणा साधला आहे.

Jayant Patil, NCP
Legislative Council Election : बच्चू कडूंनी वाढवले शिंदे-फडणवीसांचे टेन्शन; घेतला मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. यात तीन होर्डिंग लागलेले आहेत. त्यातील एका होर्डिंगवर दूध मागोंगे दूध देंगे, दुसर्या होर्डिंगवर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलं आहे. तर तिसर्या होर्डिंगवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असून त्यावर इन्व्हेस्टमेंट मांगोगे तो यूपी, गुजरात को देंगे असा आशय आहे. या टि्वटच्या माध्यमातून पाटील यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

jayant patil
jayant patil sarkarnama

पाटील यांनी शेअर केलेल्या फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! असा टोलाही ट्विटद्वारे केलं आहे. सध्या पाटील यांचं टि्वट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून राजकीय वर्तुळासह सर्वच क्षेत्रातून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Jayant Patil, NCP
विखेंनी केला करेक्ट कार्यक्रम; थोरातांच्या मतदारसंघातील इंदोरीकरांच्या सासूबाईंचा भाजपमध्ये प्रवेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना प्रत्युत्तर

प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत, अशी नकारात्मकता पसरवणं अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात व अन्य राज्यात किती उद्योग आले, हे जाणून घेऊया.जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण २६,६८४ नवीन कंपन्या स्थापन झाल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये १४,९५८, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ७,९६६ नवीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या एकत्र केली तरी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या अधिक आहे असं प्रत्युत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com