'सदाभाऊ खोतांनी भाजपलाच शालीतून जोडा लगावला आहे...!'

महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? असे सदाभाऊ खोत म्हणाले होते
Jayant Patil, Sadabhau Khot
Jayant Patil, Sadabhau Khot sarkarnama

मुंबई : देशात पेट्रोल-डिझेल, LPG गॅस सिलेंडर या इंधनाच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम इतर गोष्टींवर होत असून त्यामुळे जेवण, भाजीपाला या गोष्टी देखील महागल्या आहेत. याच गोष्टीवरुन केंद्र सरकारवर टीकेचे धनी होत असतानाच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मात्र या महागाईचे समर्थन केले. महागाई म्हणतं असाल तर सोने २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेले. पण लोक खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना टोला लगावाल.

Jayant Patil, Sadabhau Khot
नाना पटोलेंना सुरा कुणी खुपसला? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

जयंत पाटील म्हणाले, उपरोधिकदृष्टया सदाभाऊ खोत भाजपच्या (BJP) विरोधात बोलू शकत नाहीत. कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे. त्यामुळे काय बोलायचे म्हणून 'शालीतून जोडा' त्यांच्याच आमदाराने भाजपला मारला आहे, अशी मिश्किल टीका पाटील यांनी केली. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचे की रडायचे हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे.

या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. एवढी प्रचंड महागाई आहे. ६० रुपयावर पेट्रोल गेले तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील, अशी शंका पाटील यांनी व्यक्त केली.

Jayant Patil, Sadabhau Khot
पटेल-पटोले वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा काँग्रेसचा इशारा

राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आलेल्या धमकीच्या पत्रावर जयंत पाटील म्हणाले, राज ठाकरे यांना कोण कशाला इजा करेल. मला वाटत नाही राज ठाकरे यांना धोका आहे. मात्र, त्यांना भीती वाटत असेल तर संरक्षण दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही. अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे. केंद्रसरकारमधूनच संरक्षण पुरवले जाते आणि त्यातच दोन-तीन उदाहरणे झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्रसरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते, असा टोला पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com