जयंत पाटलांनी राज्य सरकारच्या कर आकारणीची तुलना केली ब्रिटिश राजवटीशी

माजी मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray News
Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray NewsSarkarnama

मुंबई - राज्यात शिंदे गट व भाजप सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल व डिझेल वरील कर कमी करण्यात आला आहे. मात्र राज्यातील इतर बाबींवर कर वाढविण्यात आला आहे. या कर वाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली. ( Jayant Patal compared state government taxation to British rule )

जयंत पाटील म्हणाले, ब्रिटिशांनी मिठावर कर आकारल्यानंतर भारतातून ब्रिटिशांची राजवट संपण्याची सुरुवात झाली होती, आता भाजप सरकारने अन्नधान्यावर जीएसटी आकारल्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते अशी टीका त्यांनी केली.

Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray News
शिवसेना फुटल्याने जयंत पाटील यांचे सुतक अजुनही फिटेना!

ते पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल यांच्यासह स्टील, सिमेंटच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. हे कमी म्हणून की काय आता केंद्रातील भाजप सरकारने विविध जीवनावश्यक वस्तूनंतर आता अन्नधान्यावर देखील पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Jayant Patil News, Shivsena News, Uddhav Thackeray News
इस्लामपूर : निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांना अक्षरशः धारेवर धरले...

आधीच खते, कपडे, कोळसा, जीवनावश्यक औषधे आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांची पाठ मोडून गेली आहे, त्यात आता अन्नधान्यावर जीएसटी लावल्याने नागरिकांच्या पोटावरदेखील पाय मारण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे असा संतापही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in